पाणी टंचाई, प्रत्यक्ष पाहणी करून प्रस्ताव सादर करावा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

पाणी टंचाईः प्रत्यक्ष पाहणी करुन प्रस्ताव
सादर करावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.26(डि-24 न्यूज)- उन्हाळा कालावधी जवळ येत असतांना काही गावांमधून पाणी टंचाईची माहिती मिळत आहे. तेव्हा तहसिलदार, तलाठी, ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन टंचाई नियोजनासाठी प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
जिल्ह्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभुमिवर आज जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तर जिल्हा मुख्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके सहभागी झाले होते.
पाणीटंचाईचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक तलाठी, ग्रामसेवक यांनी तातडीने भेट देऊन पाहणी करावी. पाण्याची उपलब्धता, त्याचे स्रोत, मिळणाऱ्या पाण्याची गुणवत्ता इ.बाबत पाहणी करावी. त्यानुसार आठ दिवस आधी प्रस्ताव पाठवावा. याच कालावधीत पाणी बचतीसंदर्भात जनजागृतीही करावी. या सोबतच रोजगार हमी योजना, आरोग्य सेवा इ. बाबत नियोजन करावे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक सौर ग्राम तयार करावयाचे असल्याने त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून एका गावाची पाहणी करुन निवड करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
What's Your Reaction?






