माजीमंत्री राजेंद्र दर्डा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, शुभेच्छा देण्यासाठी शुभचिंतकांची गर्दी

इब्राहिम पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी दिली राजेंद्र दर्डा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
औरंगाबाद, दि.21(डि-24 न्यूज) माजी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र बाबू दर्डा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या कामाची छाप असलेले बाबूजी यांना शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळपासून जालना रोड येथील लोकमत भवन येथे शुभचिंतकांची गर्दी झाली होती. सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.
विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यापारी , सामाजिक संघटनांचे पदाधिकारी विविध पक्षांचे कार्यकर्ते हे पुष्पहार, पुष्पगुच्छ घेऊन वाढदिवसाची शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी किराडपूरा येथील माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे शहागंज ब्लॉक अध्यक्ष इब्राहिम पटेल आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह बाबूजींना गुलाब पुष्पांचा मोठा हार घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी हाजी तय्यब पटेल, अली बाबा, शौकत पटेल, रफीक पटेल, शेख आरेफ, इस्माईल पटेल, श्रीराम इंगळे, हाजी अस्लम, शेख नईम, शेख आसेफ, जहुर अण्णा व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






