नितिन बगाटेंची बदली रत्नागिरी पोलिस अधिक्षक पदी, त्यांच्या जागी येणार सोमय मुंडे...!

बगाटे यांची बदली, रत्नागिरीचे पोलिस अधिक्षक, त्यांच्या रिक्त जागेवर सौमय मुंडे
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद) परिमंडळ-1 चे पोलिस उपायुक्त आयपिएस नितिन बगाटे यांची बदली पोलिस अधिक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर पोलिस अधिक्षक लातूर सौमय विनायक मुंडे पदभार घेणार आहे. राज्यातील 21 पोलिस अधिका-यांचे बदलीचे आदेश आज गृह विभागाचे उपसचिव व्यंकटेश भट यांनी काढले आहे. यामध्ये सातारा पोलिस अधिक्षक समीर असलम शेख यांची बदली पोलिस उपायुक्त बृहन्मुंबई, सहायक पोलिस महानिरीक्षक मुंबई राजतिलक रोशन यांची बदली पोलिस उपायुक्त ब्रहन्मुंबई, पोलिस अधिक्षक पालघर बाळासाहेब पाटील यांची बदली पोलिस अधिक्षक नाशिक ग्रामिण, अपर पोलिस अधिक्षक अभियान गडचिरोली यतिश देशमुख यांची बदली पोलिस अधिक्षक पालघर, पोलिस उपायुक्त ठाणे शहर मोहन दहिकर यांची बदली पोलिस अधिक्षक सिंधुदुर्ग, विश्व पानसरे पोलिस अधिक्षक बुलढाणा यांची बदली समादेशक, रा.रा.पोलिस बल क्रं.9,अमरावती, निलेश तांबे पोलिस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर, पोलिस अधिक्षक, बुलढाणा, तुषार दोषी पोलिस अधिक्षक, लोहमार्ग पुणे यांची बदली पोलिस अधिक्षक सातारा, जयंत मिना पोलिस अधिक्षक, दहशतवादी पथक, पुणे यांची बदली पोलिस अधिक्षक लातूर, रितू खोकर, अपर पोलिस अधिक्षक, सांगली यांची बदली पोलिस अधिक्षक धाराशिव(उस्मानाबाद),
राकेश ओला , पोलिस अधिक्षक अहिल्यानगर(अहेमदनगर) यांची बदली पोलिस उपायुक्त बृहन्मुंबई, सोमनाथ घार्गे, पोलिस अधिक्षक रायगड यांची बदली पोलिस अधिक्षक अहिल्यानगर, आंचल दलाल समादेशक, रा.रा.पोलिस बल गट क्रं.1 पुणे यांची बदली पोलिस अधिक्षक रायगड, महेंद्र पंडित, पोलिस अधिक्षक, कोल्हापूर यांची बदली पोलिस उपायुक्त ठाणे शहर, योगेश कुमार गुप्ता, पोलिस अधिक्षक, नागरी हक्क संरक्षण, नांदेड यांची बदली पोलिस अधिक्षक कोल्हापूर, बच्चन सिंह पोलिस अधिक्षक, अकोला यांची बदली समादेशक, रा.रा.पोलिस बल क्रं.4, नागपूर, अर्चित चांडक, पोलिस उपायुक्त, नागपूर शहर यांची बदली पोलिस अधिक्षक अकोला, मंगेश शिंदे, पोलिस उपायुक्त, विशेष कृती दल, आर्थिक गुन्हे, बृहन्मुंबई यांची बदली पोलिस अधिक्षक, लोहमार्ग, नागपूर.
What's Your Reaction?






