नवनियुक्त राज्य वक्फ मंडळाचे सदस्य म्हणून एड एस.आय.हाश्मी, वक्फ बोर्डाच्या कार्यालयात केला सत्कार
नवनियुक्त राज्य वक्फ मंडळ सदस्य ऍड.एस.आय. हाश्मी यांचा सत्कार
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.22(डि-24 न्यूज)
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे नवनियुक्त सदस्य ऍड.एस.आय. हाश्मी यांचा वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यालय येथे आगमन झाले. यावेळी राज्य वक्फ मंडळाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी मुशीर अहमद शेख यांनी शाल व पुष्पहार टाकून स्वागत व सत्कार केला.
ऍड. हाश्मी हे राज्यातील नामांकित वकील असून त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती मुळे वक्फ मंडळाच्या कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी मोठा फायदा होणार असल्याचे गौरवदगार मुशीर अहमद यांनी व्यक्त केले. यावेळी वक्फ मंडळाचे लेखा अधीक्षक सय्यद शाकिर अली, सियानात विभागाचे खुसरो खान, आस्थापना विभागाचे अब्दुल सत्तार, जिल्हा वक्फ अधिकारी अतिक शेख, चौकशी विभागाचे अदनान कुरेशी व शारेख काजी, अतियातचया सनोबर शेख, नोंदणी विभागाच्या शेख हामना व मुदसीर शेख, विधी विभागाचे शेख सलमान, ऑडिटचे अदनान सिद्दीकी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना सदस्य ऍड.हाश्मी यांनी वक्फ मंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना, भ्रष्ट प्रतिमेचा भ्रम दूर करण्याचा प्रयत्न दूर करण्यात येईल. तसेच नवीन वक्फ बिलावर जेपीसीच्या रिपोर्ट आल्यावर तर्कसंगत अभ्यास केला जाईल असे सांगितले.
या पदावर नियुक्ती केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांचे त्यांनी आभार मानले.
What's Your Reaction?