जिल्हा माहिती कार्यालयाचा चित्ररथ न्या.रविंद्र घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना

जिल्हा माहिती कार्यालयाचा चित्ररथ
न्या.रविंद्र घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज):- सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या चित्ररथास आज मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायमूर्ती तथा औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठ पालक न्यायमुर्ती रविंद्र घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून फुलंब्री येथून रवाना करण्यात आले. फुलंब्री येथे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विधी सेवा महाशिबिरांतर्गत शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजीत करण्यात आला होता. त्या मेळाव्यात हा चित्ररथ नेऊन जनजागृती करण्यात आली. चित्ररथावर बसविण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनचे विमोचन फित कापून करण्यात आले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व पालक न्यायमूर्ती संजय देशमुख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभा इंगळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणीस, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा नागरे, तहसिलदार डॉ. कृष्णा कानुगले आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजनेच्या विशेष घटक योजनेतून हा चित्ररथ तयार करण्यात आला असून जिल्ह्यात 161 गावांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जनजागृती करणार आहे.
What's Your Reaction?






