राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, जिल्ह्यात 42 पथकामार्फत होणार तपासणी...!

 0
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, जिल्ह्यात 42 पथकामार्फत होणार तपासणी...!

राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रम; जिल्ह्यात 42 पथकांमार्फत होणार तपासणी...

छत्रपती संभाजीनगर, दि.9(डि-24 न्यूज):-जिल्ह्यात 0 ते 18 वयोगटातील बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे तसेच त्यांच्यात आढळलेल्या वैद्यकीय, मानसिक, शारिरीक समस्यांवर त्वरीत उपचार करणे यासाठी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम दि. 1 पासून सुरु झाला आहे. जिल्ह्यात 42 पथकांमार्फत अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. 

 राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय शाळा आणि अंगणवाडीतील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांच्या तपासणीसाठी एकूण 42 आरोग्य पथक कार्यरत आहेत. एका आरोग्य पथकांमध्ये दोन वैद्यकीय अधिकारी स्त्री व पुरुष एक औषध निर्माता एक आरोग्य सेविका असते अशा चार कर्मचाऱ्यांचे एक आरोग्य पथक आहे. शैक्षणिक वर्षांत शाळेतील बालकांची आरोग्य तपासणी एक वेळा केली जाते तर अंगणवाडी मधील बालकांची आरोग्य तपासणी दोन वेळा केली जाते.

   जिल्ह्याचा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंगणवाडी विशेष आरोग्य तपासणी कार्यक्रम

1)छत्रपती संभाजीनगर तालुक्यात एकूण 41 अंगणवाडी व 4 शाळा 5 आरोग्य पथक.

2)गंगापूर तालुक्यात एकूण 16 अंगणवाडी 6 पथक. 

  3) कन्नड तालुक्यात एकूण 119 अंगणवाडी व 6 शाळा 6 पथक.

  ४) खुलताबाद तालुक्यात एकूण 98 अंगणवाडी व 13 शाळा 2 पथक.

  5) पैठण तालुक्यात एकूण 134 शाळा 5 पथक. 

  6) फुलंब्री तालुक्यात एकूण 42 अंगणवाडी 3 पथक.

  7) सिल्लोड तालुक्यात एकूण 88 अंगणवाडी 5 पथक.

  8) सोयगाव तालुक्यात एकूण 21 अंगणवाडी 2 पथक.

  9) वैजापूर तालुक्यात एकूण 65 अंगणवाडी 4 पथक.

महानगरपालिका शाळा व अंगणवाडी पूर्ण तपासण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातून प्राप्त झाली आहे. या मोहिमे मध्ये सर्व बालकाची तपासणी करुन घ्यावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.विशाल बेंद्रे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जवळील आरोग्य केंद्र किंवा तालुक्यातील उपजिल्हा व रुग्णालय ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क साधावा. अधिक माहिती साठी 104 या हेल्पलाईनवर कॉल करावा,असे आवाहनही करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow