सतर्कतेने करावे चारा वितरणाचे नियोजन - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 0
सतर्कतेने करावे चारा वितरणाचे नियोजन - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

सतर्कतेने करावे चारा वितरणाचे नियोजन- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

११.८७ लाख मे.टन चाऱ्याची उपलब्धता; पशुसंवर्धन विभागाची माहिती

औरंगाबाद,दि.27(डि-24 न्यूज) दुष्काळाच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात चाऱ्याची उपलब्धता पुरेशी आहे. पुरवठ्याच्या दृष्टिने जिल्ह्यात चारा वितरणाचा भौगोलिक समतोल साधला जाईल असे नियोजन करुन जिल्ह्यातील सर्व भागात पशुपालकांना आपल्या पशुंसाठी चारा सहज उपलब्ध होईल असे नियोजन सतर्कतेने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. 

 जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सकाळी खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत दुष्काळी परिस्थितीतील चारा उपलब्धता व नियोजन याबाबत आढावा घेतला. यावेळी पशुसंवर्धन विभागामार्फत चारा टंचाई वर मात करण्यासाठी तालुकानिहाय सुक्ष्म नियोजन करण्यात आले असून सद्यस्थितीत ११. ८७ लाख मे.टन चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे व तो आगामी तीन ते चार महिने पुरेल,अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी दिली. 

पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात ६ लाख ३३ हजार २ इतके पशुधन असून त्यात लहान जनावरे १ लाख ५८ हजार २५१, मोठी जनावरे ४ लाख ७४ हजार ७५२आहेत तर ५ लाख १९ हजार ४२६ शेळी मेंढ्यांची संख्या आहे.  

पशुधनास टंचाई स्थितीत लागणाऱ्या चाऱ्याची आवश्यकता याप्रमाणे...

लहान जनावराला एका दिवसाला ३ किलो वाळलेला तर मोठ्या जनावराला ६ किलो चारा द्यावा लागतो. 

११ लाख ८७ हजार मे.टन चारा उपलब्ध...

या आवश्यकतेनुसार लहान जनावरांना जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार २५१ लहान जनावरांना ४७५ मे. टन, ४ लाख ७४ हजार ७५२ मोठ्या जनावरांना २८४९ मे.टन तर ५ लाख १९ हजार ४२६ शेळ्या मेंढ्यांसाठी ५१९ मे.टन चारा असा एकूण ३ हजार ८४३ मे. टन चारा दैनंदिन लागणार आहे. तर प्रति महिना १ लाख १५ हजार २८१ मे. टन चारा आवश्यक आहे. जिल्ह्यात सध्या ११ लाख ८७ हजार मे.टन चारा उपलब्ध आहे.

वर्षभरात २३ लाख ४२ हजार मे. टन चारा उत्पादन

 हा ११ लाख ८७ हजार मे. टन चारा सन २०२३-२४ च्या खरीप व रब्बी हंगामात उत्पादीत झाला आहे. जिल्ह्यात २ लाख ८४ हजार ८५६ हेक्टर क्षेत्रावर १२ लाख ६८ हजार मे.टन खरिपात, तर ४ लक्ष ४ हजार मे. टन चारा रब्बी हंगामात उत्पादन झाला आहे. या शिवाय नैसर्गित स्रोतातून २ लाख १७ हजार मे.टन वैरण उपलब्ध झाली. शिवाय पशुसंवर्धन विभागाने राबविलेल्या वैरण विकास कार्यक्रमातून १ लाख ४१ हजार मे. टन चारा उपलब्ध झाला आहे. असा जिल्ह्यात एकूण २३ लाख ४२ हजार मे. टन चारा निर्माण झाला. वर्षभर तो वापरुन आता सध्या ११ लाख ८७ लक्ष मे.टन चारा उपलब्ध आहे, असे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. 

सन २०२३-२४ मधील वैरण उत्पादनः-

• खरीप हंगाम (माहे जुलै ते ऑक्टों २०२३) पेरणी क्षेत्र २,८४,८५६ हे. क्षेत्रावर १२.६८लक्ष मे. टन 

• रब्बी हंगाम पेरणी क्षेत्र २,१३,७२४ हेक्टर क्षेत्रावर ४.०४ लक्ष मे.टन

• नैसर्गिक (जंगल/वनक्षेत्र/गायरान/ओसाड व मशागतीस अयोग्य जमीन, पडीक जमिन व बांधावर) वैरण उत्पादन क्षेत्र २,४१,४१५ हेक्टर क्षेत्रावर २.१७ लक्ष मे.टन

• पशुसंवर्धन विभागाचा वैरण विकास कार्यक्रम ८६१० लाभार्थ्यांना वितरीत ६०२.७० क्विंटल बियाण्यातून निर्माण चारा १.४१ लक्ष मे. टन

• कृषि विभागामार्फत तसेच मुरघासाद्वारे उत्पादित चारा ३.१२ लक्ष मे.टन.  

• असा एकूण खरीप, रब्बी तसेच इतर मार्गाने उत्पादित झालेला चारा २३.४२ लक्ष मे.टन

जिल्ह्याबाहेर चारा नेण्यास मनाई...

जिल्ह्यात चारा टंचाई भासू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याबाहेर चारा नेण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. टंचाईच्या काळात पशुंचे आरोग्य सांभाळण्यासाठीही पशुसंवर्धन विभागाला पशुंना वेळीच औषधोपचार देण्याच्या सुचना निर्गमित केल्या असून सतर्कता बाळगण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

पशुपालकांकडे विक्रीसाठी चाऱ्याची उपलब्धता-

 तालुक्यात ३ पशुपालकांकडे १३८० मे.टन, फुलंब्री तालुक्यात एका पशुपालकाकडे ३५० मे.टन, गंगापूर तालुक्यात ९ पशुपालकांकडे ५१ मे.टन, खुलताबाद १३ पशुपालकांकडे ७४ मे.टन, सिल्लोड तालुक्यात एका पशुपालकाकडे ५०० मे.टन अशा एकूण २७ जणांकडे २३५५ मे. टन चारा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे पशुसंवर्धन विभागाने कळविले आहे.

त्यांची नावे व संपर्क याप्रमाणे:-

 तालूका

१. श्री. गणेश जगन्नाठ पवार रा. पिंप्रीराजा (९९७५९४१०२३) 

२. श्री. कृष्णाजी शिवाजी डोखळे रा. टाकळी माळी (९८८१७५७२१८)

३. श्री. कृष्णा ससेमहाल रा. शेलूद (८८९८८३३६९७७)

     ता. फुलंब्री

४. श्री. सुरेश नंदुसिंग सिसोदे रा. नायगव्हाण (७४१०७७४२९)

 ता. गंगापूर

५. सचिन एकनाथराव फोपसे रा. जामगाव (८०५५८९५५५५)

६. ऋषिकेश सुरेश मगर रा. जामगाव

७. बाबासाहेब रामनाथ फोपसे रा. जामगाव

८. शरद भाऊसाहेब बोडखे रा. बगडी (७७७४९३७१३०)

९. भगवान मनोहर ढवाळ रा. जामगाव (९८३४५८४८९५)

१०. जयराम यलप्पा शिंदे रा. आगर कानडगाव (९७६७९०५३७९)

११. कल्याण कडू दळे रा. आगर कानडगाव (९७६७९०५३७९)

१२. रविंद्र बाळासाहेब शिंदे रा. आगर कानडगाव (७०३८१३९५२७)

१३. सुनिल शिवाजी थोरात रा. आगर कानडगाव (९२८४३८२०१८)

ता. खुलताबाद

१४. प्रकाश हरिचंद्र भागवत रा. गल्ले बोरगाव (८८६४२५८८७)

१५. सतिश नारायण भागवत रा. गल्ले बोरगाव (९८३४६३६३५१)

१६. विजय रामचंद्र चंद्रटिके रा. गल्ले बोरगाव (९५७९०६१७३४)

१७. रामदास साहेबराव भागवत रा. गल्ले बोरगाव (९७६४५३३५४३)

१८. कारभारी चिमाजी बोडखे रा. वेरुळ (९९६०३३६९४३)

१९. आनंद संताराम देवहारे रा. गल्ले बोरगाव (९७६६०६१०३)

२०. अनिल वाल्मिक जाधव रा. गल्ले बोरगाव (९७३०४९३०७६)

२१. शंकर काळूसिंग कहाटे रा. गल्ले बोरगाव (७०८३४४५८२४)

२२. ताराचंद्र काळूसिंग कहाटे रा. गल्लेबोरगाव

२३. अमोल कचरु दुधारे रा. गल्लेबोरगाव (९५७९१९३१७८)

२४. विलास शंकरराव गायकवाड, रा. गल्लेबोरगाव

२५. संतोष दादाराव खोसरे रा. गल्लेबोरगाव (९७६५९८६११०)

२६. बाळू हारकळ रा. गल्लेबोरगाव (९४०४८६४६२६)

ता. सिल्लोड

२७. पेंडगाव आकाश ॲग्रो फार्मस रा. पेंडगाव (९७६५३३७६९९९)

 या पशुपालकांकडेही विक्रीसाठी चारा उपलब्ध असल्याचे पशुसंवर्धन विभागाने कळविले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow