पोलिस निरीक्षकाने मागितली एक लाखाची लाच, एसिबिने रंगेहाथ पकडले

पोलिस निरीक्षकाने मागितली एक लाखाची लाच, एसिबिने रंगेहाथ पकडले
धाराशिव(उस्मानाबाद), दि.26(डि-24 न्यूज)
तक्रारदार यांच्या मुलाचे गुन्ह्यात मदत करण्यासाठी मपोना मुक्ता लोखंडे यांनी पोलिस निरीक्षक मारोती शेवाळे यांच्यासाठी व स्वतःसाठी एक लाखाची लाच मागितली. पोलिस निरीक्षकांनी मुक्ता लोखंडे हिला भेटण्यास सांगितले. तडजोडी अंती 95 हजार लाचेची रक्कम शासकीय विश्रामगृह येथे स्विकारण्याचे कबुल केल्याचे निष्पन्न झाले. लाचेची रक्कम लोखंडे यांनी स्विकारली असता रंगेहाथ पकडले. आरोपिंच्या घराची झडती सुरु आहे. शेळके यांच्या अंगझडतीत एक विवो कंपनीचा मोबाईल व एक मोटोरोला कंपनीचा मोबाईल मिळून आला. लोखंडे यांच्या अंगझडतीत एक मोबाईल, एक मोटारसायकल व ओळखपत्र मिळून आले. पोलिस स्टेशन आनंदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कार्यवाही पोलिस अधिक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधिक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस उप अधिक्षक योगेश वेळापुरे, सहायक सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, सापळा पथक पोअं नागेश शेरकर, शशिकांत हजारे यांनी केली आहे.
What's Your Reaction?






