राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतिनिमित्त समता दिंडी...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समता दिंडी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 26(डि-24 न्यूज)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने सामाजिक न्याय विभागातर्फे सकाळी साडेसात व. समता दिंडीचे आयोजन करण्यात आले. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून समता रॅलीची सुरुवात केली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. भडकलगेट येथून मिल कॉर्नर मार्गे छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, त्यानंतर दिंडी औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संपन्न झाली.
समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दीपक खराडे, सहायक आयुक्त आर. आर. शिंदे यावेळी उपस्थित होते.
सदर दिंडीमध्ये श्री. सरस्वती कन्या प्रशाला, क्रांती चौक येथील बाल ज्ञान मंदिर, शिशुविहार माध्यमिक शाळा, श्री. शारदा मंदिर कन्या प्रशाला, छत्रपती संभाजीनगर या शाळेतील विद्यार्थी, सामाजिक न्याय विभागातील शासकीय वसतिगृहाचे असे 650 विद्यार्थी सहभागी झाले.
What's Your Reaction?






