राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26 (डि-24 न्यूज)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगीता राठोड यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो उमाकांत पारधी, जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नायब तहसीलदार केशव डकले यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली. छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, अज्ञान ,अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता निवारण यासमस्यांच्या निवारणासाठी राजकीय आणि प्रशासनातून घेतलेला पुढाकार याबाबतचे त्यांचे प्रयत्न याबाबत माहिती दिली. तसेच कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांच्या प्रगतीचा विचार मांडणारे राजर्षी शाहू महाराज हे लोकराजा आहेत. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करुन समाजातील सर्व स्तरातील जनतेला त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले. शासन आणि प्रशासन लोकाभिमुख करण्याचा परिपाठ त्यांनी स्वतःच्या कार्यपद्धतीतून घालून दिला आहे,असे डकले यांनी आपल्या भाषणात सांगितले.
What's Your Reaction?






