शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने शिवसेना अक्रामक, बँकेच्या व्यवस्थापकांना विचारला जाब...!
शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने शिवसेना अक्रामक, बँकेच्या व्यवस्थापकांना विचारला जाब...!
औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) शेतकरी बांधवांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकाची शाळा मोहिमेतंर्गत आज हर्सुल टि पाॅईंट येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विभागीय कार्यालय येथे जाऊन पीक कर्ज प्रकरणाची माहिती घेतली. तसेच संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील एकूण 117 बँकेसमोर जोरदार आंदोलन करून बँक व्यवस्थापकांना जाब विचारण्यात आला. बळीराजाच्या मदतीसाठी शिवसेना आणि शिवसैनिक नेहमी तत्पर असून आगामी काळात प्रलंबित पीक कर्ज प्रकरणे तातडीने मार्गी लागली नाही तर शिवसेना पद्धतीनुसार आंदोलन केले जाईल अशी सूचना यावेळी बँक व्यवस्थापकांना केली. वेळ पडली तर बँकेच्या बोर्डाला काळे फासले जाईल असा इशारा विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी दिला आहे.
याप्रसंगी माझ्यासमवेत महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, शहर संघटक सचिन तायडे, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, लताताई पगारे, उपशहरप्रमुख संजय हरणे, शेतकरी विनायक धनाजी मंदाडे, भाऊसाहेब देवराव सपकाळ, रावसाहेब औताडे, देविदास हरणे, चिंतामण मंदाडे व सोमीनाथ एकनाथ गुंजाळ उपस्थित होते.
What's Your Reaction?