औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदार चिठ्ठ्या वाटपास(पोलचिट) सुरुवात
 
                                मतदार चिठ्ठ्या वाटपास प्रारंभ...!
औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने येत्या दि.१३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी मतदारांना आपले मतदानाचे केंद्र , यादीतील क्रमांक इ. ची माहिती असलेली मतदार चिठ्ठी वाटपास आजपासून प्रारंभ झाला अशी माहिती सहा. नोडल अधिकारी अविनाश अंकूश यांनी दिली,
जिल्ह्यातील ९ विधानसभा क्षेत्रनिहाय मतदार चिठ्ठ्यांचे वितरण होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांना आपले मतदानाचे केंद्र, मतदार यादीतील क्रमांक इ. माहिती सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी मतदार चिठ्ठ्या (Voter Information Slip) दिल्या जातात. मतदारांपर्यंत ह्या चिठ्ठ्या त्या त्या भागात नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत वितरीत होणार आहेत. मतदारांनी आपापल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आपली मतदार चिठ्ठी प्राप्त करुन घ्यावी व सोमवार दि.१३ मे रोजी आपला मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            