दिपावली खरेदीचा सुपर संडे....
दिपावली खरेदीचा सुपर संडे....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)- मंगळवारी दिपावली सन हा देशभरात साजरा होणार आहे. आज रविवारी दिपावलीच्या खरेदीचा बाजारपेठेत सुपर संडे पाहायला मिळाला. आज सुट्टीच्या दिवशी बाजारपेठेत कपडे व इतर साहित्य खरेदीसाठी कुटुंबासह गर्दी झाली होती. टिळकपथ, पैठण गेट, औरंगपुरा, निराला बाजार, शहागंज, सिटीचौक, हडको, टिव्ही सेंटर व शहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली.
बाजारपेठेत पोलिस व वाहतूक पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहे. पुजेच्या सामान सुध्दा यावेळी कुटुंबासह नागरीकांनी खरेदी केली. सोने व वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल जीएसटी कमी झाल्याने दिसून आला.
टिळकपथ येथे कपड्यांच्या दुकानासमोर रस्त्यावर पोषाख परिधान केलेले पुतळे लावल्याने मोटारसायकल पार्कींगसाठी व पायी चालणाऱ्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. मनपाने दुकानासमोर रस्त्यावर लावलेले पोषाख परिधान केलेले पुतळे हटवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यामुळे रहदारीला पण त्रास होत आहे.
What's Your Reaction?