उद्यापासून एसटीचा चक्का जाम आंदोलन, सदावर्तेचा इशारा, प्रशासन एक्शन मोडमध्ये

 0
उद्यापासून एसटीचा चक्का जाम आंदोलन, सदावर्तेचा इशारा, प्रशासन एक्शन मोडमध्ये

उद्यापासून एसटीचा चक्का जाम, सदावर्तेचा इशारा, प्रशासन एक्शन मोडमध्ये 

औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, थकीत महागाई भत्ता मिळावा, एसटी बससेवा प्रवास सुरक्षित असायला चांगली बस रस्त्यावर उतरवा, आरटीओच्या नियमानुसार बससेवा सुरू आहे का...? प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात आहे का अशा अनेक मागणी करत गुणरत्न सदावर्तेनी उद्या 6 नोव्हेंबरपासून एसटीचा चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली. 

संघटनांनी चक्का जाम आंदोलन करण्याची नोटीस दिली नाही. तर मग हा चक्का जाम कशासाठी असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या दिपावली सुट्टीनिमित्त एसटी बसमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. प्रशासनाने एक्शन मोडमध्ये येत सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश काढले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केले आहे. डि-24 न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यात या चक्का जामचा कोणताही प्रतिसाद मिळणार नाही. सर्व चालक वाहक व कर्मचारी कामावर हजर राहणार आहे. प्रवाशांना त्रास होणार नाही याची खबरदारी एसटी प्रशासनाने घेतली आहे. आतापर्यंत एक पण संघटना पुढे आलेली नाही चक्का जाम करण्यासाठी. सदावर्तेच्या घोषणेवर काही परिणाम होणार नाही अशीही चर्चा एसटी महामंडळात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow