लेबर कॉलनी मैदानावर यंदा सजणार फटाक्यांचा बाजार

 0
लेबर कॉलनी मैदानावर यंदा सजणार फटाक्यांचा बाजार

लेबर कॉलनी मैदानावर यंदा फटाक्यांचा बाजार भरणार...!

औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) यंदा लेबर कॉलनीच्या खुल्या मैदानावर फटाक्यांचा बाजार भरणार आहे. दुकाने थाटण्याचे काम येथे जोरात सुरू आहे. सध्या 13 दुकाने येथे थाटण्यात आली आहे. शहरातील मध्यवर्ती भागात फटाक्यांच्या विक्रीचा बाजार येथे भरणार असल्याने प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. जिल्हा प्रशासनाने हि जागा फटाक्यांच्या बाजारासाठी दिली असल्याची माहिती डि-24 न्यूजच्या सुत्रांकडून मिळाली आहे. फटाका असोशिएशनच्या वतीने दुकाने सजवण्याचे काम सुरू आहे. आवश्यक सुरक्षेचे नियोजन येथे केले जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow