जमियत-ए-उलमाए हिंदच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे वितरण

 0
जमियत-ए-उलमाए हिंदच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे वितरण

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली जमियत-ए-उलमाए हिंद शिक्षण क्षेत्रात योगदान

गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले लाखो रुपयांची स्काॅलर्शिप

औरंगाबाद, दि.5(डि-24 न्यूज) जमियत -ए-उलमाए हिंद(अर्शद मदनी) च्या वतीने देशभरात सामाजिक कार्यात अग्रेसर असते. अन्याय झालेल्या पिडीतांना न्याय मिळवून मदत दिली जाते. शिक्षण क्षेत्रातही जमीयतचे योगदान आहे. सर्व जाती धर्मातील गरजू विद्यार्थ्यांना जे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना आज लाखो रुपयांची स्काॅलर्शिपचे चेक मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या रोशनगेट येथील कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमात वाटप करण्यात आले. शहराध्यक्ष हाफिज अब्दुल अजीम यांच्या अध्यक्षतेखाली 15 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना हे चेक वाटप करण्यात आले. तीन महिने अगोदर गरजू विद्यार्थ्यांचे राज्य कमिटीच्या वतीने ऑनलाईन अर्ज भरुन घेत सेलेक्शन कमेटीने सर्वेक्षण करुन दरवर्षीप्रमाणे स्काॅलर्शिपचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती हाफिज अब्दुल अजीम यांनी दिली आहे. मेडीकल, इंजिनिअरींग, कायदेविषयक शिक्षण, फाॅर्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. राज्यात एक कोटींपर्यंत स्काॅलर्शिप वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी जमीयतचे आभार मानले.

याप्रसंगी हाफीज इक्बाल अन्सारी, मौलाना कैसर खान, मौलाना अब्दुल मतीन, नासेर सिद्दीकी, शारेक नक्शबंदी, मुस्तफा खान, हाफिज इसा, अतिक पालोदकर, इर्शाद मुलतानी, शेख मोहसीन, मोबीन खान आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow