फुलंब्रीच्या भिषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू, दोन चुलत भावांचा समावेश, दोन जखमी...

फुलंब्रीच्या कार अपघातात 3 युवकांचा मृत्यू, दोन जखमी, दोन चुलत भावांच्या मृत्यूने हळहळ
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज), काल उशिरा रात्री फुलंब्री बिल्डा फाटा, पगडे वस्तीजवळ भिषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये दोन चुलत भावांचा समावेश आहे. तर दोन युवक या अपघातात गंभीर जखमी झाले त्यांच्यावर छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद) शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे अशी माहिती फुलंब्री पोलिसांनी दिली आहे.
फुलंब्री कडून छत्रपती संभाजिनगरकडे येताना डाव्या बाजूला कठड्याला IGNIS कार क्रं.MH-20, EJ-1586 धडकून हा भिषण अपघात झाला. हा अपघात एवढा भिषण होता की कारचे दोन तुकडे झाले आहे. तीन युवकांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डाॅक्टरांनी मृत घोषित केले. रियान जमील शेख, वय 16, राहणार पिंप्री राजा, या.छत्रपती संभाजिनगर, अरफात आसिफ शेख, वय 17, रा.पिंप्री राजा, दोघे सख्खे चुलत भाऊ, जामा मस्जिद कमेटीचे हाजी अब्दुल जब्बार यांचे दोघे नातू होते. दोघेही एकूलते एक मुले पालकांना होती. सय्यद मारुन माजिद, राहणार रोशन गेट, छत्रपती संभाजिनगर या तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. मारुन हा एटीसीचे गयास खान यांचे नातू होते. दोन कुटुंबातील तीन युवकांच्या मृत्यूने शहरात शोककळा पसरली आहे. या अपघातात शेख शरीफ, उजेर खान राहणार छत्रपती संभाजिनगर हे जखमी झाले त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे त्यांची प्रकृती बरी असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
What's Your Reaction?






