प्रशांत म्हस्के यांचे निधन

प्रशांत मस्के यांचे निधन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि.24(डि-24 न्यूज) : कुंभारवाडा येथील रहिवाशी प्रशांत चंद्रकांत मस्के (55) यांचे मंगळवार, 23 रोजी रात्री 11:50 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरून (कुंभारवाडा) येथून बुधवार, 25 रोजी सकाळी ठीक 11 वाजता निघेल. त्यांच्यावर कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल.
प्रशांत म्हस्के हे शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगा, सून असा परिवार आहेत. अमोल मस्के यांचे ते वडील होत.
What's Your Reaction?






