शासकीय सेवेत कंत्राटीकरणाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध, क्रांतीचौकात केले आंदोलन

 0
शासकीय सेवेत कंत्राटीकरणाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध, क्रांतीचौकात केले आंदोलन

शासकीय सेवेत कंत्राटीकरणाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध

क्रांतीचौकात केले आंदोलन...

औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) राज्य सरकार 70 हजार कर्मचाऱ्यांनी भरती कंत्राटी पद्धतीने करणार असल्याचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने क्रांतीचौकात विरोध आंदोलन करण्यात आले. 

सरकारच्या या निर्णयाचे आंदोलन करत कार्यकर्त्यांनी अक्रामक आंदोलन करत विरोध केला.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे, शहराध्यक्ष जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे यांनी सांगितले कंत्राटी भरतीमुळे वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर परिणाम होत आहे. कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रीयेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध आहे. अक्रामक आंदोलन करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. स्पर्धा परीक्षेचेत परीक्षेचे पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी. अशी मागणी सुध्दा आंदोलनात करण्यात आली. यावेळी जीआरच्या झेरॉक्स प्रतची होळी करण्यात आली. युवकांचे भविष्य अंधकारमय करणा-या शासन आदेशाच्या झेरॉक्स प्रतीची होळी करण्यात आली. कंत्राटी मुख्यमंत्री, कंत्राटी उपमुख्यमंत्री असे बोर्ड हातात घेऊन युवकांनी निदर्शने केली.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे, शहराध्यक्ष जगताप, शहर कार्याध्यक्ष शेख फारुख आदी उपस्थित होते. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow