जुलूस-ए-मोहंमदी" यावर्षी दुसऱ्या दिवशी, पोलिस आयुक्त यांच्या बैठकीनंतर निर्णय

 0
जुलूस-ए-मोहंमदी" यावर्षी दुसऱ्या दिवशी, पोलिस आयुक्त यांच्या बैठकीनंतर निर्णय

जुलूस-ए-मोहंमदी दुसऱ्या दिवशी, पोलिस आयुक्त यांच्या बैठकीनंतर निर्णय

औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज) दरवर्षी शहरात प्रेषित हजरत मोहम्मद स.यांच्या जन्मदिनी "ईद-ए-मिलादुन्नबिनिमित्ताने "जूलूस-ए-मोहंमदी" काढण्यात येते. या जुलूसमध्ये हजारो भाविक सहभागी होतात. 28 सप्टेंबर रोजी ईद-मिलादून्नबी देशभर साजरी होणार आहे. याच दिवशी श्री गणेश विसर्जन आहे म्हणून पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी जुलूस नंतर काढावा अशी विनंती मुस्लिम बांधवांच्या कमिटीला केली. हि विनंती संयोजकांनी मान्य करत जुलूस शनिवारी, 30 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला अशी माहिती निमंत्रक डॉ.शेख मुर्तुझा यांनी दिली आहे.

गणेश विसर्जन व जुलूसचा मार्ग एकच असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेत हा निर्णय घेतला असल्याचे डॉ.शेख यांनी सांगितले. संयोजकांसोबत पोलिस आयुक्त यांनी बैठक घेतली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

30 सप्टेंबर रोजी यंदाही तोच मार्ग जुलूसचा असणार आहे. सकाळी 8.30 वाजता हजरत निजामोद्दीन चौक येथून "जुलूस-ए-मोहंमदी" सुरु होईल. शहागंज चमन, राजाबाजार, नवाबपूरा, जिन्सी, जिन्सी चौक, कैसर काॅलनी, चंपा चौक, लोटाकारंजा, बुढीलेन, जुनाबाजार, सिटीचौक, गांधीपुतळा मार्गे परत हजरत निजामोद्दीन चौक येथे येईल. येथे ध्वजारोहण करत सलाम पढण्यात येईल असे संयोजकांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow