उच्च न्यायालयाने घेतली इम्तियाज जलील यांच्या जनहित याचिकेची दखल, सरकारी वकील घाटी रुग्णालयात दाखल

 0
उच्च न्यायालयाने घेतली इम्तियाज जलील यांच्या जनहित याचिकेची दखल, सरकारी वकील घाटी रुग्णालयात दाखल

उच्च न्यायालयाने घेतली इम्तियाज जलील यांच्या जनहित याचिकेची दखल, पाहणी पथक घाटी रुग्णालयात दाखल

सत्ताधारी केंद्रातील मंत्री डॉ.भागवत कराड, राज्याचे दोन मंत्री भुमरे आणि सावे, आमदार सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या खाजगीकरणावर बोलत नाही याबद्दल जलिल यांनी टीका केली.... सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे खाजगीकरणाला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले...

औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) घाटी रुग्णालयात मागील काही दिवसांपासून औषधांचा तुटवडा, कर्मचारी वर्ग कमी व विविध कारणांमुळे रुग्णांच्या उपचारांमध्ये होत असलेला विलंब, 18 हून जास्त रुग्णांचा मृत्यू आणि नांदेड येथे झालेल्या 41 हुन जास्त रुग्णांचा जीव गेल्याने लोकांमध्ये संताप आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्य यंत्रणा व रुग्णालयात सुविधा शासनाच्या वतीने दिली जात नसल्याने गरीब रुग्णांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे यामुळे स्वतः उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करुन स्वतः न्यायालयासमोर उभे राहुन युक्तिवाद करत आहे.

आरोग्य यंत्रणा मजबूत व्हावेत व गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार शासकीय रुग्णालयात मिळावे हा या जनहित याचिकेचा उद्देश आहे. आज दुपारी उच्च न्यायालयाचे पाहणी पथकाने दौरा करून पाहणी केली.

आज उच्च न्यायालयात जलील यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. याचिकाकर्ते इम्तियाज जलील व सरकारी वकील एड सुजित कारले यांना आदेश दिले तुम्ही स्वतः घाटी रुग्णालयात जाऊन आढावा घ्या, काय परिस्थिती आहे, रुग्णांवर होत असलेले उपचार, त्यांना मिळत असलेले उपचार, रिक्त कर्मचारी वर्ग, स्वच्छता, औषधांचा पुरवठा आदींचा अहवाल मंगळवार पर्यंत उच्च न्यायालयात दाखल करावे. सरकारी वकील व जलील यांनी घाटी रुग्णालयात दोन तास आढावा घेतला. अस्वच्छतेचे छायाचित्रे न्यायालयात दाखल केली होती आज स्वच्छता दिसून आली. आरोग्य यंत्रणेत ज्या त्रुटी आहेत ते दुरुस्त व्हावे. रुग्णांना योग्य पध्दतीने सुविधा व औषधी मिळावे जेणेकरून कोणाचा जीव जाणार नाही यासाठी स्वतः उच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागली. 

दिडशे कोटी रुपये खर्च करुन भव्य सुपर स्पेशालिटी रुग्णालय येथे उभे झाले तीन चार वर्षे झाली सुरू केले नाही. स्टाफ व नर्स नसल्याचे कारण दिले जात आहे. हे रुग्णालय खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रुग्णालयात तीस लाखांची यंत्रसामग्री आहे. उच्च न्यायालयाने सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भरती प्रक्रिया 28 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावी हे 1 ते 4 नोव्हेंबर पर्यंत कर्मचारी सेवेत असावी रुग्णालय 5 नोव्हेंबर पर्यंत सुरू करावे. असे आदेश दिले आहेत. 

आज जो आढावा सरकारी वकील यांनी घेतला तो सविस्तर अहवाल न्यायालयात दाखल करतील. 10 ऑक्टोबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. आम्हाला गरीब रुग्णांसाठी जो मी लढा देत आहे, आरोग्य यंत्रणा मजबूत झाली पाहिजे, निष्पाप रुग्णांना जीव गमवायची वेळ येणार नाही. मला न्याय मिळेल अशी माहिती डि-24 न्यूजला खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow