अपक्ष उमेदवार हिशाम उस्मानी यांना मिळाली शिवनयंत्र निशाणी
अपक्ष उमेदवार हिशाम उस्मानी यांना मिळाली शिवनयंत्र निशाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)
दि.4(प्रतिनिधी) आज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. 107- औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून 11 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. आता 24 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी अपक्ष उमेदवार हिशाम उस्मानी आहे. त्यांचा या यादीत शेवटचा 24 वा नंबर आहे. त्यांना शिवणयंत्र हि निशाणी मिळाली आहे अशी माहिती त्यांनी दिली.
ते म्हणाले उमेदवारी अर्ज दाखल केला त्या दिवसापासून प्रचाराला सुरुवात केली आहे. ज्यावेळी शहरात एकच आमदार होते तेव्हा माजी नगरसेवक स्व.जावेद हसन खान हे निवडणुकीत उभे होते त्यांना त्यावेळी शिवणयंत्र निवडणूक निशाणी मिळाली होती. त्यावेळी हि निशाणी फार गाजली होती माझ्या समाजसेवेच्या जोरावर यंदाही हि निवडणूक निशाणी गाजणार व मला मतांचा आशिर्वाद या मतदारसंघातील मतदाता देतील. या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
What's Your Reaction?