बदलापूरची घटना, गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची राष्ट्रवादीची मागणी
बदलापूरची घटना, गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची राष्ट्रवादीची मागणी
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.21(डि-24 न्यूज) बदलापूर येथील शाळेतील तीन वर्षांच्या दोन चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील दोषिंना तात्काळ कठोर शिक्षा द्यावी, राज्यात वारंवार होणाऱ्या अत्याचाराची घटना बघता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागणीचे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार महीला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देऊन करण्यात आली आहे.
राज्यातील महीलांना महीन्याला 1500 रुपये नको सुरक्षा हवी आहे. राज्यात कोठेही महीला सुरक्षित नाही अशी टिका शहराध्यक्ष सौ.मेहराज इसाक पटेल यांनी केली.
याप्रसंगी राष्ट्रीय सचिव विनाताई खरे, ललिताताई मगरे, शकीला खान, मनिषा पवार, संध्या सिरसाठ, अनिसा खान,सलमा शेख , शबाना बेगम आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?