दलित पँथरचा सुवर्णमहोत्सवी वर्ष कार्यक्रम आमखास मैदानावर

दलित पँथरचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आमखास मैदानावर
पत्रकार परिषदेत आरपिआय(आठवले) प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांची माहिती...दहा हजारांचा जनसमुदाय येणार...
औरंगाबाद, दि.21(डि-24 न्यूज) दलित पँथर या लढाऊ व जहाल संघटनेची स्थापना 9 जुलै 1972 रोजी करण्यात आली होती. त्यानंतर थोड्याच दिवसात या लढाऊ आंबेडकर निष्ठ चळवळीची लढाऊ पिढी उदयास आली होती. या चळवळीने भारतीय इतिहासात आपले नाव कोरले. अन्याय अत्याचार विरोधात देशात तीव्र लढा उभारला व त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या दलित पँथर संघटनेच्या स्थापना दिवस 9 जूलै 2023 हे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून 50 वर्ष पूर्ण होत असल्याने हा भव्य मेळावा 14 ऑक्टोबर रोजी आमखास मैदानावर सायंकाळी पाच वाजता होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आरपिआयचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी दिली आहे.
मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी बाबूराव कदम उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे उपस्थिती जेष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे, दलित साहित्यिक डॉ.प्रा.ऋषीकेश कांबळे, रिपाइं प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, अध्यक्ष ऐक्यवादी दिलीप जगताप, रिपाइं प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे, मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके, प्रदेश उपाध्यक्ष दौलत खरात, प्रदेश संघटन सचिव ब्रम्हानंद चव्हाण, विजय सोनवणे, युवक अध्यक्ष पप्पू कागदे, किशोर थोरात, डि.एन.दाभाडे, चंद्रकांत चिकटे, राजा ओव्हाळ, सिध्दार्थ भालेराव, भास्कर रोडे, संजय बनसोडे उपस्थित राहणार आहेत. मुख्य संयोजक जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, शहराध्यक्ष नागराज गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष राकेश पंडीत तर संयोजक अरविंद अवसरमण, दिलीप पाडमुख, विजय मगरे, प्रविण नितनवरे, अमोल नरवडे, मनोज सरीन, लक्ष्मण हिवराळे, देवराज विर, प्रमुख उपस्थिती एस.डी.मगरे, मधुकर चव्हाण, कुंदन लाटे, रमेश दाभाडे, शरद किर्तीकर, सुखदेव सोनवणे, गोरख तुपे, भानुदास किर्तीकर, डॉ.जयचंद कासलीवाल, विश्वनाथ दांडगे, रवी जावळे, संदेश शेळके, सुमित कदम, लक्ष्मीकांत पिंपळे, राजु प्रधान, प्रकाश गायकवाड उपस्थित राहणार आहे.
What's Your Reaction?






