पुणे येथे होणाऱ्या तब्लिगी इज्तेमासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी

मुस्लिम समाजाचा पुणे येथे होणाऱ्या इस्जतेमासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) पुणे येथे राज्यस्तरीय मुस्लिम समाजाचा तबलिगि इस्जतेमाचे आयोजन 2 फेब्रुवारी पासून तीन दिवस आयोजन करण्यात आलेले आहेत. त्यासाठी औरंगाबाद येथून इस्जेमासाठी भाविक जातात. भाविकांची प्रवासाची सोय व्हावी याकरिता विशेष रेल्वे सोडण्यासाठी अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईन इनामदार यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जालनाचे खासदार डॉ. कल्याणराव काळे यांच्याकडे पुणे येथे विशेष रेल्वे सोडण्यासाठी मागणी केली होती या मागणीला कल्याण काळे यांनी विशेष रेल्वे सोडण्यासाठी औरंगाबाद छत्रपती रेल्वेचे व्यवस्थापक सुनील काळे यांना पत्र दिले आहेत. यावेळी रेल्वेचे व्यवस्थापक सुनील कुमार यांना भेटून निवेदन देताना अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, अनिस पटेल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ अरुण शिरसाट, जावेद पठाण आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






