शहराला वाढीव पाणी पुरवठ्याचा आमचा पर्यायच यशस्वी ठरणार - राजेंद्र दाते पाटील

शहराला वाढीव पाणी पुरवठ्याचा आमचा पर्यायच यशस्वी ठरणार - राजेंद्र दाते पाटील
900 एम एम लाईन साठी आमचाच पाठपुरावा यशस्वी ठरला !
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19 (डि-24 न्यूज)-
आता कसोटी महानपालिकेच्या यंत्रणेची असुन जर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मनपा प्रशासन आमच्या पर्यायावर मेहनत घेतल्यास किमान चार ते पाच दिवसा आड पाणी मुख्य योजनेतील तांत्रीक चुका दुरुस्त होई पर्यंत देणे शक्य असुन या मुळे पाणी पुरवठ्या तील अंतर किमान 50% कमी करता येईल ही बाब आम्ही 08 में 2025 रोजी गांधी स्मारक निधी सभागृह गांधी भवन समर्थनगर येथे भव्य पत्रकार परिषदेत हा विषय मांडताना स्पष्ट केले होते की,
आता पाणी पुरवठा नियोजन करता येईल काय... ?
" अगदी जायकवाडी पासुन पाईप लाईन नागमोडी टाकली आहे. ती सरळ करून नाही घेतली तर पाण्याच्या दबावा मुळे सतत पाईप लाईन फुटत राहील व पाणीपुरवठा नियोजन करणे अत्यंत जिकिरीचे होणार आहे चुकीच्या पाईप लाईन अंथरल्या गेल्यास भविष्यात हा सततचा त्रास मनपास होणार असुन तांत्रीक दृष्ट्या अयोग्य अंथरलेली पाईप लाईन ताब्यात घेण्याची जनविरोधी कारवाई मनपाने करू नये. या जलवाहिन्या भविष्यात फुटत राहिली तर त्यावेळी मनपाचे जे अभियंते काम करतील त्यांना सस्पेंड व्हायची वेळ येईल आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण काम पूर्ण करून निघून जाईल. 2500 एमएमची पाईप लाईनचे काम संपुर्ण पणे संपून ती समाधानकारक टेस्टींग नंतर पूर्णतः सुरू होत नाही तो पर्यंत तात्पुरती पाणी पुरवठा व्यवस्था म्हणुन 900 एम एम च्या लाईनचा पर्याय आम्ही स्वतः पुढे आणला होता व त्यासाठी आवश्यक असणारा निधी मिळावा म्हणुन सतत पाठपुरावा आम्ही केल्याचे सर्वश्रुत आहे त्यामुळे 900 एम एम ची लाईन तांत्रीक दृष्ट्या अधिक सक्षम करून घेणे अत्यावश्यक आहे.यात आज पर्यंत वॉटर ट्रीटमेंट प्लांट अद्यापही संपलेले नाही. वास्तावीक पाहता 900 एम एम लाईन मधुन 75 एम एल डी पाणी पुरवठा होणे अपेक्षित आहे.परंतु याचे उत्तर कोण देणार ? एकच मोटार बसवलेली आहे आणि आश्चर्य म्हणजे या मोटारीवर मीटरच नाही. मग पाणी किती येते याचे मोजमाप मनपा कसे करणार ? आता या सगळ्याच लाईनचे गौड बंगाल असे आहे की, जुनी 700 एम एम लाईन आणि जुनी 1200 एम एम लाईन ला चिकटून ही पाईप लाईन अगदी नागमोडी टाकली जात असल्याने ती एक तर सरळ रेषेत अलाईनमेंट नाही आणि म्हणुन पाण्याच्या दबावा मुळे ती लाईन सतत फुटणार आहे. याची जवाबदारी कोणाची असेल ? हे सुद्धा निश्चीत करणे गरजेचे आहे. जुन्या 700 एम एम लाईन आणि जुन्या 1200 एम एम लाईन मधुन फक्त 125 एम एल डी पाणी मिळते आणि आमच्या सूचनेवर गांभीर्याने कारवाई केल्यास 125 अधिक 75 एम एल डी असे किमान 200 एम एल डी पाणी मिळू शकते त्यात सद्य स्थितित मुख्य तांत्रीक अडचण ही आहे की, येऊ घातलेले हे पाणी कुठे साठवणार ? शेवटच्या नळ धारक ग्राहकास ते मनपा कसे पुरवणार ? याचे मनपा कडे उत्तरच नाही ? सगळा ढिसाळ कारभार सुरु आहे. "
काही एक नियोजन नाही...
फिल्टर टँक म्हणजे जल शुद्धीकरण तात्काळ सुरु करून तिन्ही पंप चालु केल्या शिवाय पर्याय नाही "
असे सगळे आम्ही भव्य पत्रकार परिषदेत स्पष्ट केले असल्याचे पीपल्स फोरम फॉर सोशल कॉजचे सचिव व जेष्ठ जल अभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी स्पष्ट केले होते.
पाणीपुरवठा करण्यासाठी विविध भागातील जलकुंभ तत्काळ बांधकाम करून ते उभारून वाढीव पाणी पुरवठा होणे आवश्यक असुन आता अती महत्वाचा प्रश्न आहे की, जलकुंभ नाही तर शेवटच्या ग्राहका पर्यंत जल पुरवठा कसा करणार...? शुद्धीकरण
केलेले पाणी नक्षत्रवाडी येथील
संतुलित जलकुंभात (एमबीआर)
पडले आहे. त्यामुळे शहराला 70 ते
75 एम.एल.डी वाढीव पाणी देण्याचे आव्हान मनपा समोर असुन अंतिम योजना पुर्ण केल्याशिवाय कुठलीही योजना जसे 700 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बंद केली तर कमी पडणारे पाणी कसे उपलब्ध करणार ? याचे सुद्धा नियोजन होणे आवश्यक असल्याचे पीपल्स फोरम फॉर सोशल कॉज चे सचिव व जेष्ठ जल अभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी स्पष्ट केले होते.
What's Your Reaction?






