डिलाॅइटचे पार्टनर दिग्विजयसिंह चुडासामा यांचा स्मार्ट सिटी कार्यालयास भेट...

 0
डिलाॅइटचे पार्टनर दिग्विजयसिंह चुडासामा यांचा स्मार्ट सिटी कार्यालयास भेट...

डिलॉइटचे पार्टनर श्री. दिग्विजयसिंह चुडासामा यांची छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी कार्यालयास भेट...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)– छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी डिलॉइट (Deloitte) या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सल्लागार संस्थेचे टेक्नॉलॉजी अँड ट्रान्सफॉर्मेशन – सायबर विभागाचे पार्टनर श्री. दिग्विजयसिंह चुडासामा यांनी आज स्मार्ट सिटी कार्यालयास भेट दिली.

या प्रसंगी त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत उपस्थित होते. त्यांनी श्री. चुडासामा यांना स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची सविस्तर माहिती दिली.

सर्वप्रथम श्री. चुडासामा यांनी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (ICCC) ला भेट देऊन तेथे बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान, निगराणी यंत्रणा व नियंत्रण प्रणालीचा आढावा घेतला. त्यानंतर स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सुरु असलेल्या प्रमुख प्रकल्पांमध्ये

शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे पुनर्निर्माण व उन्नतीकरण,

नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध डिजिटल अनुप्रयोग व ऑनलाइन सेवा,

या सर्व प्रकल्पांची त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

या प्रकल्पांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात झालेला सकारात्मक बदल, सेवा वितरणात आलेली पारदर्शकता व कार्यक्षमता याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी त्यांनी जी. श्रीकांत यांच्या दूरदृष्टीपूर्ण व परिणामकारक नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी मिशन यशस्वीपणे राबविले जात असल्याचे विशेष कौतुक केले.

या भेटीवेळी स्मार्ट सिटीतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow