एन्डलेस हेल्पिंग फाऊंडेशनच्या रोजगार मेळाव्यात 1680 युवकांना मिळाला रोजगार...!

एन्डलेस हेल्पिंग फाऊंडेशनच्या रोजगार मेळाव्यात 1680 युवकांना मिळाला रोजगार...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)- शनिवारी एमआयटी काॅलेजच्या सभागृहात एन्डलेस हेल्पिंग फाऊंडेशनच्या वतीने महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात मराठवाड्यातील हजारो युवकांनी सहभाग घेतला. सकाळी 11 वाजता एमआयटी काॅलेज संस्थेचे सचिव मुनिष शर्मा यांनी फित कापून रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केले. शंभर हुन अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना मुनीष शर्मा यांनी एन्डलेस हेल्पिंग फाऊंडेशनचे युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल कौतुक केले. आज भारताला स्किल्स असलेले कामगारांची गरज आहे तरच भारत देश आणखी प्रगती करेल. एमआयटी काॅलेजमध्ये इंजिनिअरींग व्यक्ती रिक्त एक वर्ष आणि सहा महिन्याचे नवीन स्किल्स कोर्सेस सुरु केले आहे. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी एन्डलेस हेल्पिंग फाउंडेशनचे सचिव मुकीम देशमुख यांनी सांगितले चार क्षेत्रात फाऊंडेशन काम करत आहेत. शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. कृषी, रोजगार, वैद्यकीय व शिक्षण क्षेत्रात समाजाला लाभ मिळवून देण्यासाठी काम केले जात आहे. फाऊंडेशनच्या रोजगार मेळाव्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. वेळोवेळी भविष्यात रोजगार मेळावा घेण्यात येईल. खाजगी कंपन्यांनी सहभाग घेतल्याने त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी एन्डलेस हेल्पिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष अश्फाक पटेल, उपाध्यक्ष जाकेर पटेल, करीम पटेल, अ. रहीम मोगल, डॉ.शोएब हाश्मी, बशीर पटेल, फेरोज पटेल, जावेद पटेल, बॅ.उमर फारुकी, युसुफ पटेल व संचालक यांनी रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?






