क्रांतीचौक पोलिसांची मोठी कार्यवाई, 8 किलो गांजासह दोघांना अटक...

 0
क्रांतीचौक पोलिसांची मोठी कार्यवाई, 8 किलो गांजासह दोघांना अटक...

क्रांतीचौक पोलिसांची मोठी कारवाई : 8 किलो गांजासह दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि.5(डि-24 न्यूज)- शहरात क्रांतीचौक पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 8 किलो गांजा व 81 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर क्रांतीचौक परिसरात सापळा रचण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी अरुण सिंग अरोरा (वय 31, रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश) आणि शेख गफ्फार (वय 24, रा. झारखंड) या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यांच्या जवळील बॅगची तपासणी केली असता 8 किलो गांजा (किंमत सुमारे ₹81,000) मिळून आला. या प्रकरणी दोघांविरुद्ध अंमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पो.नि. पवन चौधरी, पोलीस हवालदार मजीद पटेल, संतोष बुरुड, विजय राठोड, भावसिंग चव्हाण, विष्णु भाऊस, श्रीकृष्ण, इमरान शेख, सज्जन जोगळेकर आदींच्या पथकाने केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow