जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला...!

 0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला...!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला

औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. वेळीस पोलिसांनी ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

अधिक माहिती अशी गंगापूर तालुक्यातील कागाठाण या गावातील आपल्या शेतालगत असलेल्या शेतापर्यंत जाणारा शिवरस्ता आहे. त्या रस्त्यावर असलेल्या गायराण जमिनीवर अतिक्रमण करून एका व्यक्तीने तो रस्ता बंद केला आहे. त्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे व रस्ता सुरू करण्यात यावा या मागणीसाठी गंगापूर तहसीलदारांकडे या शेतकऱ्यांने वारंवार निवेदन करूनही त्या रस्त्यावरील अतिक्रमण काढले नसल्याने शंकर पुंजाराम औताडे या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज 20 फेब्रुवारी रोजी घडली. त्याला तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. काही दिवसांपूर्वीच अशाच एका तक्रारीचे निवारण होत नसल्याने एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यालाही ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तालुकास्तरावर अधिकारी तक्रारीचे योग्य प्रकारे निवारण करत नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे.

मागील एक महिन्यापासून शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात तालुकास्तरावर तहसीलदार दिलेल्या तक्रारीचे निराकरण करत नसल्याने शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. महिन्याभरात दोन घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील अधिकारी दिलेल्या तक्रारी वर गांभीर्याने लक्ष देत आहे किंवा नाही याबाबत शंका निर्माण होत आहेत. अशीच घटना काही दिवसापूर्वी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने संबंधित व्यक्तीला रोखले होते. त्याचीच आज पुनरावृत्ती फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडली. गंगापूर तालुक्यातील कागाठाण या गावातील आपल्या शेतालगत असलेल्या शेतापर्यंत जाणार शिवरस्ता गायराण जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीने बंद केला आहे. त्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे व रस्ता सुरू करण्यात यावा या मागणीसाठी गंगापूर तहसीलदार कडे वारंवार निवेदन शंकर पुंजाराम औताडे केली होती. शेतकऱ्याने तक्रार केली की, गंगापूर तालुक्यातील आगाठाण या गावातील , गट नं. 76 शिवार चिंचखेडा व गट नं. 15 मौजे आगाठाण गंगापुर येथे शिवरस्त्यावर रामदास भाउलाल शेलार व गट नं. 15 मधील गायरान जमिनधारक संदिप बाबासाहेव मोकळे यांनी आमच्या शेताकडे जाणारा शिवरस्ता अडविला असून त्याबद्दल त्यांनी तहसिलदार गंगापुर यांना वेळोवेळी अर्ज दिल्यामुळे त्याच्या वतीने शिवरस्त्याचा पंचनामा करण्यात आला. परंतु सुध्दा शिवरस्ता जे.सी.बीच्या सहाय्याने 15 फुटापर्यंत मोकळा करण्याविषयी आश्वासन दिले होते. परंतु आता पर्यंत शिवरस्ता मोकळा करून दिला नाही. त्यामुळे आत्मदहन करण्याची टोकाची भूमिका घेत असल्याचे शेतकरी औताडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow