धुळे, मुंबई, औरंगाबाद, भिवंडी, परभणीत उर्दु हाऊस लवकरच बांधण्यात येईल - उपमुख्यमंत्री अजित पवार

 0
धुळे, मुंबई, औरंगाबाद, भिवंडी, परभणीत उर्दु हाऊस लवकरच बांधण्यात येईल - उपमुख्यमंत्री अजित पवार

धुळे, मुंबई, औरंगाबाद भिवंडी, परभणी उर्दू हाऊस लवकरच बांधण्यात येईल

 -अजितदादा पवार

 

मुंबई, दि.20(डि-24 न्यूज) 

मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या हिताचे अनेक निर्णय सरकारने घेतले आहे. अल्पसंख्याक विकासाचा निधी 30 कोटींवर करण्यात आला भविष्यात 1500 कोटी करण्याचा मानस आहे. अल्पसंख्याक मुलींना मोफत शिक्षण व मुंबई, भिवंडी, धुळे, परभणी, औरंगाबाद येथे उर्दु हाऊस बांधण्यात येणार आहे अशी घोषणा एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विभागाच्या वतीने दिनांक 18 फेब्रवारी रोजी वाशी नवी मुंबई, येथे सिडको एक्झिबेशन सेंटर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या अल्पसंख्याक विश्वास परिषदेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्राचे निरिक्षक नजीब मुल्ला राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईद्रीस नायकवडी व कार्याध्यक्ष वसिम बुरहान यांनी केले होते. परिषदेत महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक समाजाचा विकासासाठी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईद्रीस नायकवडी यांच्या कडुन आठ ठराव मांडण्यात आले त्याला अनुमोदन कार्याध्यक्ष वसिम बुरहान यांनी केले महाराष्ट्रातुन प्रत्येक जिल्ह्यातुन हजारोंच्या संख्येने आलेल्या मुस्लिम समाजाने हात वर करून पारीत केले.

 शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण या विषयांवर उपस्थित असलेल्या मुस्लिम समाजाला संबोधित माजी मंत्री बाबा सिद्दीकी, आमदार बाबाजानी दुरानी, राष्ट्रवादी कांग्रेस महिला विभागाचे प्रदेशाध्यक्ष दिपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सैय्यद जलालोद्दीन, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे कांग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी मुस्लिम समाजाला आश्वासन दिले कि सुरक्षा आणि अनेक समाजोपयोगी योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाला मदत करण्याची घोषणा केली.

      पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आमचा पक्ष हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे, अलीकडे जालना जिल्ह्यात आणि मीरा भाईंदरमध्ये दोन समाजात तेढ निर्माण झाली होती. मी स्वतः तिथे जाऊन प्रकरण वाढण्यापासून रोखले आणि चौकशीचे आदेश दिले. आमच्या सरकारने मौलाना आझाद विकास महामंडळाचे बजेट 30 कोटींवरून 500 कोटींपर्यंत वाढवले आहे. आम्ही बजेट आणखी वाढवून 1500 कोटी करण्याचा मानसही व्यक्त केला. 

मुस्लिमांसोबतच ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये असेल अशा सर्व समाजातील मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. राज्य सरकार वक्फ बोर्ड च्या जमिनी संदर्भात जी अडचणी आहेत ते दुर करण्यात बाबत पर्यंत सुरू आहे व जे ठराव ईद्रीस नायकवडी यांनी मांडले आणि वसिम बुरहान यांनी अनुमोदन मुस्लिम समाजाने त्याला हात वर करून पाठिंबा दिला आहे राज्याचा उप मुख्यमंत्री म्हणून या नात्याने वेग वेगळ्या ठरावाचा संदर्भात मी फार बारकाईने लक्ष घालीन व मदत करील असे सांगितले मुस्लिमांसाठी नागपुर नांदेड, नागपूर, मालेगाव, सोलापूर मध्ये उर्दू हाऊस बांधण्यात आले आहे, आता औरंगाबाद धुळे, मुंबई, भिवंडी आणि परभणी येथे लवकरच उर्दू हाऊस बांधण्यात येणार आहेत. अजितदादांचे वचन आहे आणि ते मोठ्या उत्साहात जाहीर करण्यात आले.

धुळे शहरात लवकरच उर्दू हाऊस बांधण्याचे येणार असल्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) नाजीम शेख, शहराध्यक्ष माजिद अन्सारी यांनी आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow