काॅम्प्रामाईजसाठी युवकाला बोलावून केली निर्घुणपणे हत्या, आरोपिंना पोलिसांनी केली अटक...!

 0
काॅम्प्रामाईजसाठी युवकाला बोलावून केली निर्घुणपणे हत्या, आरोपिंना पोलिसांनी केली अटक...!

काॅम्प्रामाईजसाठी युवकाला बोलावून केली निर्घुण हत्या, आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) - पिईएस इंजिनिअरींग महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या नासेर खान तारेक अहेमद, वय 21, राहणार शहाबाजार, याचा रोजाबाग परिसरात रात्री उशिरा दिड वाजेच्या सुमारास निर्घृणपणे खून करण्यात आला. अशी माहिती त्याचे मोठे बंधू आमेर खान यांनी दिली आहे.

सिटी चौक पोलिसांनी 6 ते 7 आरोपींना अटक केली आहे. घटनास्थळी फाॅरेन्सिक टिमने पंचनामा सुरू केला आहे. शव विच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

मृतक नासेर खान यांचे मोठे बंधू आमेर याने सांगितले हा छोटासा विवाद 22 जुलै पासून सुरू झाला होता. माझा भाऊ माझ्या वाढदिवसाचा केक आणण्यासाठी बाहेर पडला. त्याला आरोपिंना विवाद संपवण्यासाठी पंचायत समिती परिसरात नेले. तेथे त्या गुंडांनी मारहाण केली. त्या आरोपींमध्ये कटकट गेट येथील एका माजी नगरसेवकाचा मुलगा पण होता. रोझाबाग परिसरात भावाला घेऊन जात त्यांच्या डोक्यात मागून अवजड वस्तूने हल्ला केला. खाली पडल्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला ज्यामध्ये घटनास्थळी माझ्या भावाचा मृत्यू झाला. पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घाटी रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश करत गर्दी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow