धुम स्टाईलने मोबाईल चोरी करणारे तीघे गुन्हे शाखेच्या जाळ्यात
धुम स्टाईल मोबाईल चोरणारे तिघे गुन्हे शाखेच्या जाळ्यात
1 लाख 63 हजाराचे 9 मोबाईल जप्त
औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) दुचाकीवर भरधाव वेगाने येवून धूम स्टाईलने येऊन मोबाईल हिसकावून पोबारा करणार्या 3 अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चोरट्यांकडून पोलिसांनी 1 लाख 63 हजार रुपये किमतीचे 9 मोबाईल जप्त केले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी शनिवारी कळविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित सुभाष रुपेकर, सलीम रमजान शहा, सुरेश रामअवतार कुशवाह (सर्व राहणार औरंगाबाद) अशी धूम स्टाईल वेगाने मोबाईल हिसकावून पोबारा करणार्यांची नावे आहेत. पोलीस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त अपर्णा गीते, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक काशिनाथ महांडुळे, पोलिस उपनिरीक्षक अझहर कुरेशी, पोलिस अमलदार पोपटराव मनगटे, संजय नंद, कैलास काकड, संतोष भानुसे, काकासाहेब आधाने आदींच्या पथकाने धूम स्टाईल वेगाने मोबाईल हिसकावून पोबारा करणार्यांच्या मुस्क्या आवळल्या. पोलिसांनी तिघांच्या ताब्यातून 1 लाख 63 हजार रुपये किमतीचे 9 मोबाईल जप्त केले आहेत. मोबाईल चोरट्यांकडून मोबाईल चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी व्यक्त केली आहे.
What's Your Reaction?