शहरात वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यात गृह मंत्रालयाला अपयश- खासदार सुप्रिया सुळे

शहरात वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यात गृह मंत्रालयाला अपयश- खा.सुप्रीया सुळे
पत्रकार परिषदेत सरकारवर हल्लाबोल... गुरुवारी घटी रुग्णालयात एक महीला निवासी डॉक्टराला मार लागल्याने विचारपूस करण्यासाठी सुप्रीया सुळे शहरात आले होते...
औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) डॉक्टर अथवा कुणीही असोत, शहरात हल्ला होण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे शहरात गुन्हेगारी वाढली आहे हे रोखण्यासाठी राज्याचे गृहमंत्री फेल झाले असल्याची टिका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
राज्य व शहरात क्राईम रेट वाढत चालला असून त्यास पूर्णत: गृह मंत्रालय जबाबदार आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यास गृह मंत्रालय अपयशी ठरल्याची टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
काय झाली होती घटना...
गुरुवारी रात्री शासकीय, घाटी रुग्णालयातील अपघात विभागात तरुणांचे दोन गट आपसात भिडल्याने एका तरुणाच्या हातातील राॅडचा वार महीला निवासी डॉक्टरास लागल्याने जबर मार लागला असून उपचारासाठी वार्डात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. महिला डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घाटी रुग्णालयाला भेट दिली. प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, आज सकाळी सिंदखेड राजा येथे दर्शनासाठी जाताना घाटीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याची बातमी समजली. डॉक्टरच काय राज्यातील कुठल्याही व्यक्तीवर हल्ला होत असेल तर हे चिंताजनक आहे. मी सगळी माहिती घेतली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. शहरात क्राईम वाढलेला आहे. हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. राज्याचे गृहमंत्र्यांनी जातीने लक्ष घातले पाहिजे. ऑन ड्युटी असलेल्या डॉक्टरवर वार होतो, हे लाजिरवाणे आहे. गृहमंत्र्यांनी उत्तर दिले पाहिजे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी त्यांची यंत्रणा काय करत आहे. स्थानिक डॉक्टरांनी सामंजस्य दाखवत आंदोलन मागे घेतले. घाटी प्रशासनाने तत्काळ कार्यवाही केली. तसेच डॉक्टरांच्या स्टायफंड, सुरक्षा व इतर मागण्यांबाबत वैद्यकीय मंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या. कांद्याच्या प्रश्नावर सुध्दा त्यांनी सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी घाटीत डॉक्टरांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, महीला शहराध्यक्ष मेहराज पटेल, जालना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख उपस्थित होते.
What's Your Reaction?






