नामांतरावर 22 जानेवारीला सुनावणी होणार...!
नामांतरावर 22 जानेवारीला सुनावणी !
मुंबई,दि.12 (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयात येणाऱ्या 22 जानेवारीला औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावरावर सुनावणी होईल अशी माहिती याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी दिली आहे.
त्यांनी सांगितले 8 जानेवारीला होणारी सुनावणी झाली नाही. आज न्यायालयीन कामकाज सुरू झाले असता याचिकाकर्ते यांचे वकील अॅड एस.एस.काझी यांनी मुख्य न्यायाधीश उपाध्याय व न्यायमूर्ती डॉक्टर आरीफ यांच्या न्यायालयासमोर हजर राहत या प्रकरणात पुढील तारीख देण्याची विनंती केली. यानंतर मा.न्यायालयाने सुनावणीसाठी पुढील तारीख 22 जानेवारी दिली आहे. या सुनावणीत सिनिअर कौन्सिल अनिल अंतूरकर व अॅड एस.एस.काझी युक्तिवाद करतील असे उस्मानी म्हणाले. औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामांतराचा निर्णय शासनाने घेतला त्याविरोधात याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे आता हि सुनावणी 22 जानेवारीला होणार आहे.
What's Your Reaction?