सणासुदीच्या काळात, मुंबई ते करीमनगर विशेष वातानुकूलित रेल्वे गाडी...

सणासुदीचा आनंद – मुंबई ते करीमनगर विशेष वातानुकूलित रेल्वेची सोय
प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय
नांदेड, दि.10(डि-24 न्यूज)-
सणांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई CSMT) ते करीमनगर (KRMR) दरम्यान विशेष वातानुकूलित रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही विशेष गाडी एक फेरी पूर्ण करणार असून प्रवाशांना सुलभ आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देणार आहे.
गाडीचे तपशील खालीलप्रमाणे :
गाडी क्र. 01021 — छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – करीमनगर (वातानुकुलीत) विशेष
प्रस्थान: मुंबई CSMT वरून 11 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 00:20 वाजता
आगमन: करीमनगर येथे त्याच दिवशी सायं. 16:05 वाजता
गाडी क्र. 01022 — करीमनगर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (वातानुकुलीत) विशेष
प्रस्थान: करीमनगर वरून 11 ऑक्टोबर 2025 रोजी सायं. 17:30 वाजता
आगमन: मुंबई CSMT येथे 12 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 13:50 वाजता
गाडीचे थांबे (दोन्ही दिशांना):
दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, आर्मूर, मेटपल्ली, कोरटल व करीमनगर.
गाडीची रचना:
22 एलएचबी प्रकारातील वातानुकुलीत डबे असणार असून प्रवाशांना उत्कृष्ट सोयीसुविधांसह सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही विशेष सेवा सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी दिलासा ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आगाऊ आरक्षण करून या विशेष गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. अशी माहिती
नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वे यांनी दिली आहे.
What's Your Reaction?






