कुत्र्याच्या चाव्यामुळे चिमुकल्याच्या मृत्यूनंतर मनपाचे डोळे उघडले, शालेय विद्यार्थ्यांना रेबीजवर मार्गदर्शन

कुत्र्याच्या चाव्यामुळे चिमुकल्याच्या मृत्यूनंतर मनपाचे डोळे उघडले, शालेय विद्यार्थ्यांना रेबीजवर मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज)- जाफर गेट जुना मोंढा परिसरात तीन वर्षांच्या चिमुकल्याला मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याने बळी गेला त्यानंतर मनपा प्रशासनाला निवेदन दिले होते यानंतर मनपा प्रशासनाचे डोळे उघडल्यावर शालेय विद्यार्थ्यांना श्वान चावल्यानंतर घेण्यात येणारी काळजी व रेबीज आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले.
आज 10 ऑक्टोबर रोजी जागतिक अंडी दिन निमित्ताने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग, विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, पशुसंवर्धन विभाग महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली असलेल्या डॉग शेल्टर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या निमित्ताने जम-जम-उर्दु प्राथमिक शाळा, सादात नगर येथील 500 विद्यार्थ्यांना श्वान चालण्यापासून बचाव, श्वान चावल्यानंतर घेण्यात येणारी काळजी, रेबीज आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना अंडी खाण्याचे महत्व बाबत सविस्तर माहिती देण्यात आली व विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.पुंडलिक बोरकर, प्राथमिक पशुसंवर्धन सह आयुक्त, डॉ.नानासाहेब कदम, सह आयुक्त, डॉ.असरार अहमद, सह आयुक्त पशुसंवर्धन, डॉ.जयकुमार सातव, भागवत विखे, शेख शाहेद, प्र.पशुवैद्यकीय अधिकारी मनपा हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमात होप या संस्थेचे प्रतिनिधी आकाश बेडवाल यांनी मार्गदर्शन केले.
What's Your Reaction?






