सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नांदेड -निझामोद्दीन विशेष रेल्वे

 0
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नांदेड -निझामोद्दीन विशेष रेल्वे

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नांदेड–निझामुद्दीन विशेष रेल्वेची सोय

नांदेड, दि.11(डि-24 न्यूज)-

सणांच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी हुजूर साहिब नांदेड ते हजरत निझामुद्दीन दरम्यान एकतर्फी विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्र. 07699 ही विशेष गाडी 12 ऑक्टोबर 2025 (रविवार) रोजी हुजूर साहिब नांदेड येथून रात्री 10.55 वाजता सुटेल व हजरत निझामुद्दीन येथे मंगळवारी सकाळी 9.30 वाजता पोहोचेल.

थांबे: पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, खांडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ग्वाल्हेर, ढोलपूर, आग्रा, पळवल व निझामुद्दीन येथे गाडी थांबेल.

या विशेष गाडीमध्ये एकूण 20 डबे (स्लीपर व जनरल कोचेस) असतील. रेल्वे प्रशासनाने या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केले असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाकडून करण्यात आले आहे. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाने दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow