उद्याच्या बंदला शिवसेनेचा पाठिंबा, सकाळी 9.30 वाजता क्रांतीचौकात

 0
उद्याच्या बंदला शिवसेनेचा पाठिंबा, सकाळी 9.30 वाजता क्रांतीचौकात

बंदला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) चा जाहीर पाठिंबा

बंदमध्ये उस्फुर्त सहभागी होण्याचे आवाहन

औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा सर्वत्र निषेध होत आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा बंद चे आवाहन केले आहे. तसेच सोमवार 4 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता सर्वांनी क्रांती चौक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आले. शनिवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांच्या पाठिशी सदैव असल्याचे सांगितले.

याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, सहसंपर्कप्रमुख त्रंबक तुपे, आमदार उदयसिंग राजपूत, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, सुदाम सोनवणे, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, सहसचिव धर्मराज दानवे, महिला संपर्कसंघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनीता देव, जिल्हा समनव्यक माजी महापौर कला ओझा, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, राखी परदेशी यांची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाला सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, संतोष जेजुरकर, राजू राठोड, बंडू ओक, आनंद तांदुळवाडीकर, गणू पांडे, बाप्पा दळवी, बाबासाहेब डांगे, विधानसभा संघटक रेणुकादास उर्फ राजू वैद्य, सुशील खेडकर, गोपाळ कुलकर्णी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, युवासेना जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे, मॅचिंद्र देवकर पाटील, कैलास जाधव, शुभम पिवळ, युवती जिल्हा अधिकारी सानिका देवराज, पूजा घुगे यांच्यासह तमाम शिवसैनिक व युवासैनिक आणि महिला आघाडी पदाधिकारी यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow