उद्याच्या बंदला सर्व स्तरातून पाठिंबा...हा बंद सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत

 0
उद्याच्या बंदला सर्व स्तरातून पाठिंबा...हा बंद सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत

उद्याच्या बंदला सर्व स्तरातून पाठिंबा, विद्यार्थी, रुग्णांना त्रास होणार नाही याची दक्षता

औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील आंदोलकांवर पोलिसांनी अमाणूषपणे लाठीमार केल्याने राज्यात याचे पडसाद उमटले आहेत. ठिकठिकाणी आंदोलन रास्ता रोको विविध आंदोलने निषेधार्थ केले जात आहे. उद्या सोमवारी 4 सप्टेंबर रोजी औरंगाबाद शहर व जिल्ह्यात या घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे. या बंदला विविध राजकीय पक्ष, शैक्षणिक व सहकार क्षेत्र व संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. व्यापारी महासंघाने बैठक घेतली बंदला पाठिंबा नाही पण व्यापारी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेऊ शकतात. स्वेच्छेने शैक्षणिक संस्था, शाळा सुरू राहतील. हा बंद सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. 

जीवनावश्यक वस्तू लोकांना खरेदी करता यावी, मेडीकल मधून औषधी, रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. परीक्षार्थी विद्यार्थी यांना परीक्षा देण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुरू असेल. व्यापारी महासंघाने सुध्दा आवाहन केले आहे स्वेच्छेने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावी. मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही शहरातील व ग्रामीण भागातील व्यापा-यांना आवाहन केले आहे स्वतः हून प्रतिष्ठाने बंद करुन आंदोलनात सहभागी व्हावे. रुग्णांना, विद्यार्थ्यांना, शैक्षणिक संस्था यांना त्रास होईल असे कृत्य कोणी करु नये. शांततेत हा बंद पाळायचा आहे. असे आवाहन त्यांनी केले आहे. 

कृषी उच्चतम बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठाडे यांनी सांगितले सकाळी दहा वाजेपर्यंत शेतकऱ्यांचा भाजी खरेदी विक्री व्यवहार सुरू राहणार आहे. यानंतर जाधवमंडी बंद असेल. ऑटो युनियनचे अध्यक्ष निसार अहमद खान यांनी सांगितले अंतरवाली सराटी येथे झालेल्या घटनेचा निषेध करतो. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. स्वेच्छेने ऑटो चालक मालक या बंदमध्ये सहभागी व्हावे. जास्त भाडे प्रवाशांकडून वसूल करु नये. रुग्ण व विद्यार्थ्यांना रुग्णांना विद्यार्थ्यांना सहकार्य करावे. प्रवाशांना नेण्यासाठी ऑटो सेवा सुरू राहणार आहे. जेष्ठ नागरिक यांना वाहतूकीसाठी त्रास होणार नाही यासाठी ऑटोची वाहतूक सेवा सुरू राहणार आहे. आमचा मराठा आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा असल्याचे म्हटले. स्मार्ट सिटी बस मागिल दोन दिवसांपासून बंद आहे. उद्याही बंद राहणार आहे. विविध शहरांमध्ये जाण्यासाठी एसटी बंद असल्याने खाजगी वाहनांचा वापर प्रवासासाठी करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow