अनुराग ठाकूर यांच्यावर युवक काँग्रेस संताप, विभागीय आयुक्त कार्यालयासमोर केले अनोखे आंदोलन

 0
अनुराग ठाकूर यांच्यावर युवक काँग्रेस संताप, विभागीय आयुक्त कार्यालयासमोर केले अनोखे आंदोलन

अनुराग ठाकूर यांच्यावर युवक काँग्रेस संताप विभागीय आयुक्त कार्यालयासमोर केले अनोखे आंदोलन

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.8(डि-24 न्यूज) केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल संसदेत अपशब्द वापरल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे मा.प्रदेश सचिव मसरुर सोहेल खान यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी दोन गाढव आंदोलनात आणले त्यांच्या तोंडावर अनुराग ठाकूर यांचे पोस्टर लावून घोषणाबाजी देत निषेध केला. ठाकूर यांचे प्रतिकात्मक दर्शवून दोन गाढवाला मास्क घालून चपलांचा हार घालण्यात आला. यापुढे काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात अपशब्द वापरले तर चोख प्रत्युत्तर देणार असल्याचे मसरुर खान म्हणाले.

या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव इद्रीस नवाब खान, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष मोईन इनामदार, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.शादाब शेख, युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मुजफ्फर खान, युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस शेख शफीक सरकार, मध्य विधानसभा अध्यक्ष शेख फैज, पश्चिम विधानसभा अध्यक्ष सुमेध नन्नवरे, लियाकत पठाण, आमेर रफीक खान, साजेद कुरेशी, फारुख शेख, नदीम सौदागर, आवेज पटेल, वसीम पटेल, मोहसीन खान, रिजवान खान, अशोक गहीलोत, जुल्फिकार खान, मोहम्मद आमेर आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow