दानवेंवर वडेट्टीवार यांचे आरोप, कुणबी असल्याचा दाखला बनवला, दानवेंनी आरोप फेटाळले

 0
दानवेंवर वडेट्टीवार यांचे आरोप, कुणबी असल्याचा दाखला बनवला, दानवेंनी आरोप फेटाळले

अंबादास दानवे यांच्यावर वडेट्टीवारांचे आरोप, कुणबी असल्याचा दाखला काढल्याचा आरोप...

मराठवाड्यात 28 लाख मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसी तून नोकरी मिळवली असल्याची एसआयटी चौकशीची मागणी... दानवेंनी आरोप फेटाळले...

 मुंबई,दि.30(डि-24 न्यूज) मराठवाड्यातील 28 लाख मराठ्यांनी कुणबी असल्याचे प्रमाणपत्र गुपचूप काढले. त्या प्रमाणपत्रावर नोकरी मिळवली असल्याचा गंभीर आरोप विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केल्याने खळबळ उडाली.

त्यांनी पुढे सांगितले विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मराठा असताना कुणबी असल्याचा दाखला काढल्याचा आरोप केले आहे. अंबादास दानवे यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. कुणबी असल्याचे प्रमाणपत्र मी काढले नाही. काढले असेल तर दाखवावे अशी प्रतिक्रिया दानवेंनी डि-24 न्यूजला दिली आहे.

वडेट्टीवार यांनी सांगितले दानवेंनी मराठा असून सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप केल्याने राज्यात खळबळ उडाली.

या खोट्या प्रमाणपत्रावर मंत्रालयात काही अधिकारी नोकरी करत आहे याची सरकारने एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

सचिवांकडून सर्वेक्षण केले जाईल यामध्ये अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, मराठा अशा सर्व समाज घटकातील किती कर्मचारी सरकारी सेवेत आहेत याची पडताळणी केली जाईल अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. 28 लाख मराठ्यांनी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

 विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी ओबीसी बनावट प्रमाणपत्राचे केलेले आरोप खोटे असुन असे कोणतेही प्रमाणपत्र माझ्याकडे नसल्याचे 

स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे. वड्डेटीवार यांनी माध्यमांना माहिती दिली असेल तर त्याचे पुरावे सर्वांसमोर सादर करावे, असे आवाहन दानवे यांनी केले आहे. 

विजय वडेट्टीवार यांनी व्यक्तिशः माझ्यावर केलेले आरोप पूर्णतः खोटे असून त्यांच्याकडे अशी काही माहिती असेल तर त्यांनी याचे पुरावे सादर करुन सत्य माहिती सर्वांसमोर सादर करावी. जेणेकरून वास्तव परिस्थिती समोर येईल.तसेच विरोधी पक्षनेते यांनी सत्य माहिती घेऊन असे आरोप करावे असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी दिला.

शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे. शिवसैनिक म्हणूनच मी राज्यभर फिरतो. मी कोणत्याही जातीचा नेता नसून आतापर्यंत कसल्याही आरक्षित जागेचा मी लाभ घेतलेला नाही. नगरसेवक ते विरोधी पक्षनेते पदापर्यंत पोहोचलो तरीही खुल्या गटातून मी निवडून आलेलो आहे अशी या वादावर दानवे यांनी टिप्पणी केली.

मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाचे नुकसान होईल असा निर्णय शासनाने घेऊ नये,यामुळे मराठा समाजासह इतर समाजाचे सुद्धा नुकसान होऊ शकते. मराठवाड्यातील शेतकरी समाजाचा उल्लेख अजूनही कुणबट म्हणून केला जातो, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हा पुरावा फायदेशीर ठरू शकतो,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow