इम्तियाज जलिल धडकले एमआयडीसी कार्यालयात, म्हणाले अधिकारीही दोषी

 0
इम्तियाज जलिल धडकले एमआयडीसी कार्यालयात, म्हणाले अधिकारीही दोषी

इम्तियाज जलिल धडकले एमआयडीसी कार्यालयात, म्हणाले अधिकारीही दोषी...

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद) मंत्री संजय शिरसाट यांना खुश करण्यासाठी त्यांच्या मुलाच्या कंपनीला एमआयडीसीच्या अधिका-यांनी नियम धाब्यावर बसवून ट्रक टर्मिनस साठी आरक्षित प्लाॅट अलाॅट केला याचा जाब विचारण्यासाठी कार्यकर्त्यांसह माजी खासदार इम्तियाज जलिल हे एमआयडिसी कार्यालयात धडकल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. 

त्यांनी संबंधित अधिका-यांशी यावेळी सविस्तर चर्चा केली. पंचतारांकीत शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये 20 टक्के प्लाॅट शिल्लक असले तर एमआयडिसीचा ऑक्शन करण्याचा नियम आहे. सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कुटुंबाच्या कंपनीला प्लाॅट देण्यासाठी गुपचुप गौडबंगाल करण्यात आले मग त्यांच्यासाठी नियम नाहीत का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांची कंपनी शंभर कोटींची गुंतवणूक करुन 50 लोकांना रोजगार उपलब्ध करुन देत असेल तर दुसरा कोणी हा प्लाॅट नियमानुसार घेवून 300 कोटींची गुंतवणूक करत जास्त लोकांना रोजगार मिळाला असता. ज्या अधिका-यांची सही शिरसाटांच्या कुटुंबाच्या कंपनीला प्लाॅट देण्याच्या फाईलवर सही आहे ते पण या प्रकरणात दोषी आहेत. ईडी, सिबिआयकडे तक्रार केली तर तर तेही अधिकारी अडकतील म्हणून संबंधितांवर कार्यवाही करावी नसता मी न्यायालयात दाद मागणार असा इशारा यावेळी इम्तियाज जलिल यांनी संबंधित अधिका-यांना दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow