मराठवाड्यात थंडीची लाट, औरंगाबाद गारठले, नवीन वर्षाचे थंडीत स्वागत

 0
मराठवाड्यात थंडीची लाट, औरंगाबाद गारठले, नवीन वर्षाचे थंडीत स्वागत

मराठवाड्यात थंडीची लाट, औरंगाबाद गारठले, नवीन वर्षाचे थंडीत स्वागत

औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) मराठवाडा, मुंबई, ठाण्यात थंडीची लाट कायम आहे. औरंगाबादचे तापमान 12 अंश सेल्सिअस झाल्याने गारठले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार डिसेंबर अखेरपर्यंत थंडी कायम असल्याने नवीन वर्ष 2024 चे स्वागत थंडीत करावे लागणार आहे. या गुलाबी थंडीत नाताळच्या सुट्टीत लोक पर्यटनस्थळाकडे प्रवास वाढला आहे. तर काही जण गावाकडे जात असल्याने एसटी बस व खाजगी बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. ऐतिहासिक बीबी का मकबरा, घृष्णेश्वर मंदिर, अजंठा लेणी, वेरुळ लेणी, पवनचक्की बघण्यासाठी शाळांच्या सहली येत असल्याने पर्यटनस्थळे फुल्ल झाले आहे.

थंडीच्या कडाक्यात बच्चे कंपनी गरम कपड्यांचा वापर करत मौजमजा करत आहे. पुण्यात सुध्दा थंडी वाढल्याने 9.7 तापमानाची नोंद झाली आहे. डोंगराळ भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडी वाढली आहे. उत्तरेकडील वा-यांमुळे महाराष्ट्राच्या हवामानात बदल झाला आहे.

अरबी समुद्रातील चक्रीवादळ व वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे काही दिवसांत राज्यासह देशाचा पारा घसरणार आहे अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. हि थंडीची लाट वर्ष अखेरपर्यंत असणार आहे. ग्रामीण भागात सुध्दा थंडीची हुडहुडी वाढल्याने शेकोटी पेटवली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड पण गारठले आहे. निफाडचे तापमान 9 अंशी सेल्सिअस घसरले आहे. महाबळेश्वर 15 तर मुंबईचा पारा 19 सेल्सिअस वर घसरला आहे. हि थंडीची लाट 2 जानेवारी पर्यंत असणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow