राष्ट्रवादीतून घाण गेली आता भाजपाला सत्तेतून खेचण्यासाठी कामाला लागा- महेबुब शेख

 0
राष्ट्रवादीतून घाण गेली आता भाजपाला सत्तेतून खेचण्यासाठी कामाला लागा- महेबुब शेख

राष्ट्रवादीतून घाण गेली आता भाजपाला सत्तेतून खेचण्यासाठी कामाला लागा- महेबुब शेख 

एमआयएमचा अर्थ मोदी इंम्पोर्ट मेंबर तर बीआरएस..भाजपा, फुटलेली राष्ट्रवादी आणि शिवसेना - शेख महेबुब यांचा घणाघात

औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) एमआयएम म्हणजे मोदी इंम्पोर्ट मेंबर तर बीआरएस म्हणजे भाजपा, फुटलेली राष्ट्रवादी आणि शिवसेना असा घणाघात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी केला आहे. दोन्ही तेलंगणाच्या पक्षापासून सावध राहा. एमआयएम आपल्या राज्यात एक लोकसभा व आठ विधानसभेच्या जागा लढवते आणि उत्तर प्रदेश विधानसभेत मत विभाजनासाठी भाजपाला फायदा व्हावा यासाठी शंभर जागा लढवते अशी टिका केली. राजासिंग नेहमी आपल्या भाषणात दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी गरळ ओकणारे भाषणे करतात अगोदर त्यांचे तोंड बंद करा असे आव्हान त्यांनी एमआयएम पक्षाला दिले आहे. मंत्री छगन भुजबळ व प्रफुल्ल पटेल यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. लाचारीचे राजकारण संपवण्यासाठी युवकांना आता पुढे यावे लागेल व शरद पवारांच्या पाठीमागे उभे राहावे लागेल. एकदा शरद पवार यांना 52 आमदार सोडून गेले होते त्यांच्या सोबत फक्त सहा आमदार होते त्यानंतर निवडणूका आले ते 52 आमदार पुन्हा विधानसभेत दिसले नाही हा आहे शरद पवारांचा जादू. 

राष्ट्रवादी भवन येथे भव्य कार्यकर्ता मेळावा व प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी भक्कम करत भाजपाला सत्तेतून बाहेर खेचायचे आहे. जी मते भाजपाला मिळणार नाही ते फोडण्यासाठी एमआयएम व बिआरएस आणि वंचितसारख्या पक्षांचा उपयोग मतांचे विभाजन करण्यासाठी केला जातो यासाठी कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे व जोमाने जनतेमध्ये जाऊन काम करायला हवे. आता राष्ट्रवादीतून घाण गेलेली आहे ज्या प्रकारे समुद्रात भरती ओहोटी येते तशाच प्रकारे ईडीचा धाक आणि तुरुंगात जायचे नाही या भितीने काही लोक सत्तेत सहभागी झाले त्याची पर्वा करु नये. आपल्याला मराठवाड्यातून व जिल्ह्यातून शरद पवारांचे विचाराचे व महाविकास आघाडीचे आमदार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. भाजपाला सत्तेतून खेचण्यासाठी मतांचे विभाजन होणार नाही यासाठी काम करावे लागेल. नवयुवकांना आता काम करण्याची संधी आहे. आगामी निवडणुकीत युवकांना उमेदवारी जास्त प्रमाणात दिली जाणार आहे. शरद पवारांचे धर्मनिरपेक्ष विचार घरा घरापर्यंत पोहोचवा. समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम भाजपा करत आहे त्याचे उदाहरण अंतरवाली सराटी येथील घटना आहे. सत्ताधारी भाजपा ओबीसी व मराठा समाजात भांडण लावायचा प्रयत्न करत आहे. केंद्रीत व राज्यात सत्ता भाजपाची असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदा का बनवत नाही. ट्रिपल तलाक व विविध कायदे बनवता मग आरक्षणासाठी कायदा बनवण्यासाठी यांना कोणी रोखले. ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी दाखवण्यासाठी मराठा समाजावर लाठीचार्ज केला असा आरोप महेबुब शेख यांनी आपल्या भाषणात केला. आरक्षण विरोधी सरकारला सत्तेतून खेचण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी पाच दहा लाखांची कामे देण्यासाठी अमिषे दाखवली जात आहे वीस वीस वर्षे मंत्री होता विकास केला नाही का आता सहा महीन्यात काय करणार असा टोला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना त्यांनी लगावला.

यावेळी व्यासपीठावर प्रदेश सचिव मुश्ताक अहमद, प्रदेश सरचिटणीस इलियास किरमानी, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे पाटील, महीला जिल्हाध्यक्ष छाया जंगले, शहराध्यक्ष मेहराज पटेल, युवक शहराध्यक्ष मोतीलाल जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण, शेख फारुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी महेबुब शेख यांचे ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी भवन युवकांच्या उपस्थितीत खचाखच भरले होते हे शरद पवार यांच्यावरील प्रेम आहे व त्यांची जादू असल्याचे शेख महेबुब यांनी आपल्या भाषणात जाहीर केले. मुश्ताक अहमद, ख्वाजा शरफोद्दीन, इलियास किरमानी, पांडुरंग तांगडे पाटील, अतुल गावंडे, विश्वजित चव्हाण यांची भाषणे झाली. शेकडो युवकांचा पक्ष प्रवेश व पद वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow