औरंगाबाद नामांतर विरोधी याचिकाकर्त्यांच्या डोक्यावर छत्रपती संभाजीनगर

 0
औरंगाबाद नामांतर विरोधी याचिकाकर्त्यांच्या डोक्यावर छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद नामांतर विरोधी याचिकाकर्त्यांच्या डोक्यावर छत्रपती संभाजीनगर...

इलियास किरमानी यांनी टोचले कान...

औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार शहरात आले होते त्यावेळी त्यांनी जाहीर केले होते न्यायालयाचा निर्णय अजून आलेला नाही म्हणून औरंगाबादच म्हणणार तरीही दोनीही गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगर नावाचा आपल्या व्यवहारात उपयोग करत आहे. आज राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा व प्रवेश सोहळा आयोजित केला होता. बैनरवर ठळकपणे शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर व कंसात औरंगाबाद लिहलेले होते. या कार्यक्रमात औरंगाबाद नामांतर विरोधी मुख्य याचिकाकर्ते मुश्ताक अहमद सुध्दा उपस्थित होते. त्यांनीही यावेळी मार्गदर्शन केले परंतु बैनरवर ठळकपणे लिहलेले छत्रपती संभाजीनगर वरुन ब्र सुद्धा बोलले नाही परंतु आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इलियास किरमानी यांनी कान टोचले. तरुणांना त्यांनी सांगितले बेरोजगारी वाढत आहे शेतकऱ्यांचे हाल होत आहे. शिक्षणाचा व आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरी पण दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी औरंगाबाद आणि संभाजीनगरचा मुद्दा समोर करुन राजकारण केले जात आहे. नामांतराचे मोबाईल वर स्टेटस ठेवले जात आहे त्यामुळे हाताला काम मिळणार नाही. समाजात विष पेरण्याचे काम सुरु आहे ते प्रयत्न हाणून पाडा. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन शरद पवार राजकारण करतात. जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा व एमआयएम करत आहे त्यांना येणाऱ्या निवडणुकीत एकजूट दाखवून धडा शिकवला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. आम्हाला सुध्दा जातीयवादी पक्षाचे काम करण्याची ऑफर दिली गेली आम्ही अमिशाला बळी पडलो नाही शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. धर्मनिरपेक्ष विचार पुढे नेत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow