बीड बायपास सर्व्हिस रोडवर 92 अतिक्रमण निष्कासित...

बीड बायपास सर्व्हिस रोडवर 92 अतिक्रमण निष्कासित...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांचे आदेशानुसार व अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत आज दिनांक 10 जून रोजी बीड बायपास सर्व्हिस रोड येथे अतिक्रमण केलेल्या अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई मध्ये एकूण 92 मोठी बांधकामे निष्कासित करण्यात आली असून यामध्ये पक्की दुकाने, कंपाउंड भिंती,ओटे, मोठे बॅनर, टपऱ्या व दुकानासमोरील शेड इत्यादी निष्काशीत करून जप्त करण्यात आले आहेत तसेच एकूण 67 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
सदर कारवाईस सहाय्यक आयुक्त अतिक्रमण विभाग सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त समिऊल्लाह, नगररचना विभागाचे अभियंता श्री शिवाजी लोखंडे, सचिन कुमावत इमारत निरीक्षक श्री कुणाल भोसले, शिवम घोडके श्री रवींद्र देसाई श्री सागर श्रेष्ठ नागरी मित्र पथक प्रमुख श्री प्रमोद जाधव विद्युत विभागाचे लाईनमन यांत्रिकी विभागाचे जेसीबी चालक टिप्पर चालक इत्यादी उपस्थित होते.
What's Your Reaction?






