पर्यावरण दिनानिमित्त आरोग्य केंद्र भीमनगर तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन...

 0
पर्यावरण दिनानिमित्त आरोग्य केंद्र भीमनगर तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन...

पर्यावरण दिनानिमित्त आरोग्य केंद्र भीमनगर तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन...

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद),दि.10 (डि-24 न्यूज)

 जागतिक पर्यावरण दिन 5 जूनचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्र, भीम नगर यांच्या वतीने आज दि.10 जून रोजी जिजाऊ माता उद्यान, नंदनवन कॉलनी येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

 या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली मुदगडकर, भीम नगर येथील आरोग्य कर्मचारी, परिसरातील नागरिक आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पर्यावरण जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनपा आरोग्य वैदकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. सकाळी 7 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात वाकेथॉन, मॅरेथॉन आणि सायकल रेसिंग या स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.

यावेळी उपस्थितांना झाडांचे वाटप करण्यात आले, तसेच आरोग्य केंद्राच्या आवारात 25 झाडांचे वृक्षारोपण करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढण्यासोबतच निरोगी जीवनशैली आणि आरोग्यपूर्ण जीवनासाठीही जनजागृती निर्माण झाली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow