स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दिव्यांगांना हवे राजकीय आरक्षण...!

 0
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दिव्यांगांना हवे राजकीय आरक्षण...!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दिव्यांगांना हवे राजकीय आरक्षण...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दिव्यांगांना 5 टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी सरकार व निवडणूक आयोगाकडे पत्रकार परिषदेत काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मुदस्सर अन्सारी यांनी केली आहे.

यावेळी विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी सेवेची संधी द्यावी. दिव्यांगांना मत देण्याचा अधिकार आहे परंतु घेण्याचा अधिकार देण्यासाठी राजकीय पक्षांनी सुध्दा राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. जसे एससी, एसटी ओबीसी, महीलांसाठी वार्ड व प्रभाग आरक्षित केले जाते मग दिव्यांगांसाठी का नाही असा सवाल उपस्थित केला. 5 टक्के आरक्षण मिळाले तर आपल्या समस्या सोडविण्यासाठी शासकीय कार्यालयात उंबरठे झिजवायची गरज पडणार नाही. दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिव्यांगांतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी झाले तर प्रश्न सुटतील म्हणून सर्व राजकीय पक्षांचे दिव्यांग सेलचे शहराध्यक्षांनी एकजूट दाखवून हि मागणी केली. न्याय मिळाला नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

याप्रसंगी काँग्रेसचे दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मुदस्सर अन्सारी, एमआयएमचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसीन खान, शहर जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल्ला बाबू शेख, काँग्रेसचे शहराध्यक्ष मिर्झा जकी बेग, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष शेख आफरीद, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कुमार इंगळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वसीम तन्वीर शेख, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष कलिम खान, दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नासेर शेख, शेख शाहरुख, सईद खान, रहिम खान आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow