नव वर्षानिमित्त प्रत्येक कार्यालयाने संकल्प करा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
नव वर्षानिमित्त प्रत्येक कार्यालयाने संकल्प करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)- जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपापल्या कार्यालयामार्फत येत्या नववर्षापासून लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा संपर्क करा, तसेच जिल्ह्यामध्ये उद्योग, कृषी आणि पायाभूत सुविधा विकासांसह विकास कामे राबवली जात आहेत. सर्व विभागांच्या अधिनस्त जिल्हा व तालुकास्तरीय कार्यालमांनी समन्वय साधून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक घेण्यात आली. , जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड,अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कार्यालय प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, कृषी विभाग अंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा, ॲग्रीस्टॅक नोंदणी, त्याचप्रमाणे फार्मर आयडी आणि नुकसान भरपाई प्रक्रिया या साठी विविध विभागांचा समन्वय आवश्यक आहे. या सर्व विभागांनी समन्वय साधून वेळेत काम करणे अपेक्षित आहे.औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पामध्ये उद्योग, महसूल, पोलीस व विविध कार्यालयांचा समन्वय आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दोन किंवा दोनापेक्षा अधिक विभागांचा सहभाग असतो. या शिवाय प्रत्येक शासकीय कार्यालयात कर्मचारी अधिकारी यांनी वेळेत येणे,कार्यालयीन शिस्त पाळणे, कामाची कालमर्यादा पाळणे, वेळेत तक्रारीचा निपटारा करणे याबाबींवरही सर्वांनी लक्ष द्यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी खर्च करण्याचे नियोजन करावे. मंजूर झालेला निधी समर्पित करावा लागणार नाही याची खबरदारी प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
What's Your Reaction?